या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

भागाकार


भागाकार

 👉 भागाकार म्हणजे वाटणी, विभागणी , समान वाटा करणे.

👉 भागाकार या घटकात उदाहरणामध्ये भाज्य, भाजक, भागाकार बाकी यांच्या परस्पर संबंधातील कोणतेही तीन घटक येउून त्यातील एक घटक दिला. उर्वरित घटक काढणे.

👉 सूत्र    

1 )  भाज्य = भाजक x भागाकार  + बाकी

2 )  भाजक =          भाज्यबाकी

                       ----------------

                          भागाकार

 3)   भागाकार =    भाज्यबाकी

                         ----------------

                            भाजक

👉 कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर तीच संख्या येते.

👉 अपूर्णांकात अंशस्थानी असलेली संख्या भाज्य असतेतर छेदस्थानी असलेली संख्या भाजक असते.

उदा.  60 ÷ 6

60    – भाज्य

---  +  ------

6     - भाजक

1 )  अनेकांची किंमत दिली असता त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार केला जातो.

2) ज्या संख्येने भागतात तिला भाजक ज्या संख्येला भागतात तिला भाज्य म्हणतात. येणा-या उत्तराला भागाकार म्हणतात.

वरील सुत्रानुसार - भाज्य = भाजक x भागाकार + बाकी   30 = 7 x 4 + 2

👉 लक्षात ठेवा :  भाज्य = ( भाजक x भागाकार ) + बाकी

गुणाकार भागाकार परस्परविरूदध क्रिया आहेत.

9 x5 = 45   यावरून  45 ÷ 9 = 5 आणि 45 ÷ 5 = 9 हे दोन भागाकार मिळतात.

👉 शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो.

👉 कोणत्याही संख्येला 1 भागले असता  येणारा भागाकार तीच संख्या असते.

👉 नमुना प्रश्न

1)      1) 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले, तर भागाकारात कितीचा फरक पडेल ?

1)      1)1628   2)   1221  3) 1407   4) 407

स्पष्टीकरण :  4884 ÷ 4 = 1221 आणि 4884 ÷ 3 =1628

        या दोन भागाकारांतील फरक (1628 – 1221 ) = 407 आहे.


पर्याय क्र. 4  हे अचूक उत्तर आहे.

 

 2)       भागाकाराच्या एका उदाहरणात, भाजक 27, भागाकार 44 बाकी 19 आहे ;  तर भाज्य किती असेल?

 1)     1188   2) 836   3)  557   4)  1207


स्पष्टीकरण भाज्य = भाजक X भागाकार + बाकी

                = 27 X 44 + 19 = 1188 + 19 = 1207

   पर्याय क्र. 4  हे अचूक उत्तर आहे.

 

 

No comments:

Post a Comment