या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

पदावली व अक्षरांचा वापर


पदावली व अक्षरांचा वापर
 👉 गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार एकत्रितपणे पदावलीमध्ये दिलेल्या असतात.

👉 दोनपेक्षा अधिक क्रिया एखादया उदाहरणात असल्यास खालील पद्धतीने त्या कराव्यात त्याचा 

क्रम असा असावा :  कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी

दिलेल्या उदाहरणात कंस दिला असेल तर त्या कंसातील रित प्रथम करावी.  त्यानंतर डावीकडून प्रथम 

गुणाकार किंवा भागाकार असेल तर प्रथम करावा.

शेवटी डावीकडून बेरीज / वजाबाकी करावी. 

👉 नमुना उदा. 
 25 ÷ 5 + 4 - ( 2 x 3 ) प्रथम कंस सोडवावा.
25÷ 5 + 4 - 6    भागाकार
= 5 + 4 - 6    बेरीज
= 9 - 6  वजाबाकी
= 3
 👉 अक्षराचा वापर :  गणितामध्ये कोणत्याही संख्येसाठी अक्षराचा वापर करून गुणधर्म सांगता येतात. 
                             उदा. a x 0 = 0
👉 याचाच अर्थ : कोणत्याही संख्येस शून्याने गुणले असता गुणाकार शून्य येतो
👉 जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान नसते, तेव्हा त्या दोन पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणतात.
👉 कोणत्याही दोन संख्यांवर या क्रिया केल्या असता येणारे उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते.

👉 नमुना प्रश्न

1)     6÷ 6 + 6 x 6 - 6  चे सोपे रूप कोणते?
        1)  1    2) 7   3)  31  4)  36

 स्पष्टीकरण : पदावली सोडवण्यासाठी ' कचेभागुबेव ' या क्रमाचा उपयोग करू.
     ( 6÷ 6 )+ (6 x 6 )- 6 = 1 + 36 - 6 = 31 हे उत्तर मिळते
पर्याय क्र. 3   हे अचूक उत्तर आहे.

 2)   K = 5 M =3 असेल तर, 5 x K + M = किती ?
      1) 20    2) 13   3)  28   4)  40

 स्पष्टीकरण :  अक्षराची किंमत घालून पदावली सोडवावी.
5 x K + M = किती ?
= 5 x(5) + 3 = 
= 25 + 3 = 28
पर्याय क्र.  3  हे  अचूक उत्तर आहे.




No comments:

Post a Comment