या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

मोठयात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे


मोठयात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे

👉  दिलेले अंक वापरून संख्या बनवताना प्रश्नात सांगितलेल्या अटींचा विचार करावा.

👉  मोठयात मोठी संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावावा.

👉  लहानात लहान संख्या बनवताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावावा.

👉 लहानात लहान संख्या बनवताना जर दिलेल्या अंकांमध्ये 0  असेल तर अंकांचा चढता क्रम लावताना शून्य हे सुरूवातीला न घेता दुस-या स्थानावर असावे.

 उदा.  1 , 0, 5, 7, 6 यांपासून लहानात लहान पाच अंकी संख्या बनवताना; अंकांचा चढता क्रम पुढीलप्रमाणे →  0, 1, 5, 6, 7 पंरतु  01567   ही संख्या पाच अंकी होणार नाही.  म्हणून, यांची स्थानांची अदलाबदल करावी आणि तयार होणारी संख्या → 10567 ही असेल.

👉  काही वेळा अंकांची संख्या कमी दिलेली असते.  त्यावेळी अंकांची पुनरावृत्ती करावी लागते.   अशा वेळी लहानात लहान संख्या बनवताना लहान आणि मोठयात मोठी बनवताना मोठया अंकाची पुनरावृत्ती करावी.  पुनरावृत्ती  करावी म्हणजे पुन्हा पुन्हा लिहणे.

उदा.   1 )  1, 0, 4, 6  या सर्व अंकाचा वापर करून तयार होणारी लहानात लहान संख्या  = 100046

     2 )  4, 9, 8, 3  या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी सहा अंकी मोठयात मोठी संख्या = 999843 

 👉  प्रश्नातील सूचना नीट वाचणे आवश्यक आहे.  उदा. लहानात लहान सम/ विषम तसेच मोठयात मोठी विषम/ सम अशी संख्या विचारली जाते.

👉 अटीतील संख्या बनवताना प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे की पुनरावृत्ती करायची आहे. याप्रश्नातील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

 सोडविलेले प्रश्न : -

(1) 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? (2018)
(1) 1,27,108 (2) 45, 554 (3) 63, 554 (4) 91, 108

स्पष्टीकरण - 4,5,6,0,8 पासून होणारी
सर्वात मोठी संख्या = 86540
सर्वात लहान संख्या = 40568
यांची बेरीज 127108 याची निमपट = 63554
उत्तर पर्याय क्र- 3

(2) 7, 4, 0, 2, 3, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी बनवा
(1) 754320 (2) 023457 (3) 203457 (4) 230457

स्पष्टीकरण - लहानात लहान संख्या बनविताना अंकाचा चढता क्रम लावावा पण 0 अंक असल्यामुळे अंक दुसºया स्थानी घ्यावा लागेल.
म्हणजेच 023457 असे न घेता 203457 असे 
उत्तर पर्याय क्र. - 203457

(3) 2, 4, 1, 5, 7, 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी सहा अंकी लहानात लहान समसंख्या कोणती ?
(1) 1,2,4, 5,7,6 (2) 216754 (3) 765421 (4) 145672

स्पष्टीकरण- 2,4,1,5,7,6 या अंकापासून सुरुवातीला लहानात लहान संख्या बनवू
1,2,4,5,6,7 ही संख्या तयार होईल यातील सर्वात लहान सम अंक शेवटी घ्यावा. म्हणजे लहानात लहान सम संख्या तयार होईल.
145672 हे उत्तर येईल.
उत्तर पर्याय क्र- 4

(4) 0, 2, 3, 4 हे सर्व अंक वापरून सहा अंकी लहानात लहान सम संख्या तयार करा.
(1) 200043 (2) 200034 (3) 222034 (4) 220034

स्पष्टीकरण- वरील उदाहरण सोडविताना 0, 2, 3, 4 पासून लहानात लहान संख्या आधी बनवू. 200034 आता ही सम संख्या आहे का ते पाहू.
सम आहे म्हणून 
पर्याय क्र. -2 बरोबर

(5) 2 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदा वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा.
(1) 456789 (2) 987654 (3) 987645 (4) 986547

स्पष्टीकरण- पर्यायात विषम संख्या असेलेले पर्याय.
पर्याय क्र. 1, 3, 4 आहेत. यातील सर्वात मोठी संख्या
पर्याय क्र- 3 मध्ये 987645 आहे.

 

 




No comments:

Post a Comment