या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

कालमापन


 कालमापन


👉 तास, मिनिटे, सेकंद ही कालमापनाची एकके आहेत.
1 मिनिट = 60 सेकंद
1 तास  =   60 मिनिटे
पाव तास =  15 मिनिटे
अर्धा तास =   30 मिनिटे
पाउूण तास =  45 मिनिटे   

👉 घडयाळ वाचनाच्या पध्दती :
सव्वा वाजले =  1 वाजून 15 मिनिटे
दीड वाजले = 1 वाजून 30 मिनिटे
पावणे दोन वाजले  =  1 वाजून 45 मिनिटे
अडीच वाजले = 2 वाजून 30 मिनिटे
साडे तीन वाजले =   3 वाजून 30 मिनिटे

👉 12 ताशी कालमापन पद्धती :
दुपारचे 12 वाजले म्हणजे मध्यान्ह झाली आहे असे म्हणतात.
दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतच्या काळास मध्यान्होत्तर काळ (pm ) म्हणतात.
रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंतच्या काळाला मध्यान्हपूर्व काळ (am) म्हणतात.
सकाळचे 7 वाजून 40 मिनिटे ही वेळ मध्यान्हपूर्व 7 : 40 किंवा 7:40 am अशी दाखवतात, तर संध्याकाळचे 7 वाजून 40 मिनिटे ही वेळ मध्यान्होत्तर 7:40 किंवा7:40 pm  अशी दाखवतात.

👉 24 ताशी कालमापन पद्धती :
या पद्धतीत दुपारी 12 च्या पुढे मध्यान्होत्तर 1 वाजला, (12 + 1 ) = 13  वाजले आहेत असे म्हणतात.  मध्यान्होत्तर 5 वाजले असता ( 12 + 5 ) = 17 वाजले आहेत असे म्हणतात.

👉 दुपारी बाराच्या पुढे माजणे :
13 म्हणजे माध्यान्होत्तर 1.
14 म्हणजे माध्यान्होत्तर 2.
15 म्हणजे माध्यान्होत्तर 3.
16 म्हणजे माध्यान्होत्तर 4.
24 म्हणजे रात्रीचे 12 हेच 00 असे दाखवतात.

नमूना प्रश्न :

1 )   अनिलने 2 तास प्रवास रेल्वेने, 4 तास 35 मिनिटे प्रवास बसने व 1 तास 5 मिनिटे प्रवास मोटारगाडीने केला;   तर रेल्वे व मोटारगाडी यांच्यापेक्षा त्याने बसने किती अधिक प्रवास केला?
1)  5 तास 40 मिनिटे      2)  3 तास 5 मिनिटे   3 )  6 तास 35 मिनिटे    4) 1 तास 30 मिनिटे
स्पष्टीकरण :
तास
मिनिटे
रेल्वेन केलेला प्रसास =

2

मोटार गाडीने केलेला प्रवास = 
+
1
05
रेल्वे व मोटारागाडीचा एकूण प्रवास =
3
05
तास
मिनिटे
बसने केलेला प्रवास =
4
35
रेल्वे व मोटारगाडीने केलेला प्रवास =
-
3
05
दोन्ही प्रवासातील फरक=
1
30

पर्याय क्र.
हे अचूक उत्तर आहे.
2 ) 'सव्वा पाच वाजलेम्हणजे किती वाजून किती मिनिटे झाली ?
1) 5 वा.25 मि.    2)  5 वा.15 मि.    3) 5 वा.45 मि.   4) 5 वा.20 मि.

स्पष्टीकरण :  1 तास = 60 मिनिटे, अर्धा तास = 30 मिनिटे व पावतास =  15 मिनिटे
सव्वा तास = एक तास + पाव तास
सव्वापाच वाजले =  5 वाजून 15 मि.
पर्याय क्र. : 2 हे अचूक उत्तर आहे.









No comments:

Post a Comment