या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

वर्तुळ


वर्तुळ

👉उपघटक -  त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्र, परीघ,  आंतरभाग, बाहयभाग, वर्तुळकंस

👉त्रिज्या -  वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय. 

एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात.

👉जीवा-  वर्तुहावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय

👉व्यास - वर्तुळ केंद्रातून जाणा-या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात.

व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.

वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो.

👉वर्तुळाचा आंतरभाग - वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा आंतरभाग म्हणतात.

👉वर्तुळाचा बाहयभाग -  वर्तुळाच्या बाहेर असलेल्या भागाला वर्तुळाचा बाहयभाग म्हणतात.

👉वर्तुळाचा परीघ - वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परीघ म्हणतात.

👉वर्तुळ कंस - वर्तुळ परीघाच्या लहान मोठया भागांना वर्तुळकंस म्हणतात.

वर्तुळ कंसाला तीन अक्षरी नाव देतात

O - वर्तुळ केंद्र

OP - त्रिज्या

QP - जीवा    

RP - व्यास

RQP - वर्तुळ कंस

S,T - वर्तुळाच्या आंतरभागातील बिंदू

M,N - वर्तुळाच्या बाहयभागातील बिंदू

R,Q,P - वर्तुहावरील बिंदू

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment