या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

विरामचिन्हे व त्याचे प्रकार
आपण संभाषण करतांना/बोलतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.
विरामचिन्हे दर्शविणारा तक्ता :

अ.क्र.

चिन्हाचे नाव

चिन्ह

केव्हा वापरतात

1

पूर्णविराम

.

वाक्य पूर्ण झाल्यावर

शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे

उदा.

माझे जेवण झाले.

मा.क.(मोहनदास करमचंद)

2

अर्धविराम

;

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना

उदा.

विजय हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.

3

स्वल्पविराम

,

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास

संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.

उदा.

माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत.

राम, इकडे ये.

4

अपूर्णविराम

:

वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.

उदा.

पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5,7,9,12,15,18

5

प्रश्नचिन्ह

?

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.

उदा.

तुझे नाव काय?

तू कोठून आलास?

6

उद्गारवाचक

!

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी.

उदा.

बापरे! केवडा मोठा साप!

आहाहा! किती सुरेख देखावा.

7

अवतरणचिन्ह

(” ”)        (‘   ')

दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्‍याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता.

एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास.

दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना.

उदा.

तो म्हणाला, “मी घरी येईन.

मराठी भाषेची लिपी देवनागरीआहे.

8

संयोगचिन्ह

-

दोन शब्द जोडतांना.

ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास,

उदा.

प्रेम-विवाह

क्रिडा-संकुल

9

अपसरण चिन्ह (डॅश)  (स्पष्टीकरण चिन्ह)

_

बोलतांना विचारमाला तुटल्यास.

स्पष्टीकरण लावयाचे असल्यास.

 

10

विकल्प चिन्ह

/

एखाधा शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात.

उदा.

मी रेल्वेने/बसने जाईन.




No comments:

Post a Comment