या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

दिनदर्शिका



दिनदर्शिका

👉 1 दिवस = 24  तास

👉 1 सप्ताहाचे ( आठावडयाचे ) वार = 7

👉 एका वर्षाचे महिने = 12  महिने

👉 1 वर्षाचे दिवस =   365 दिवस  52 आठवडे 1 दिवस लीप वर्ष असेल तर  366 दिवस 52 आठवडे 2 दिवस

👉 31 दिवसांचे महिने =  जानेवारी,मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर एकूण 7 महिने

👉 30 दिवसांचे महिने =  एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर एकूण 4 महिने

👉 28 किंवा 29 दिवसाचा महिना  =  फेब्रुवारी   एकूण 1 महिना

👉 लीप वर्ष : 
1) लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात.

2) दिलेल्या सनदर्शक संख्येला 4 ने नि:शेष भाग गेल्यास ते लीप वर्ष असते. उदा.
1996, 2000,  2004,  2008,  2012, 2016 2020, 2024 ही लीप वर्षे आहेत.

3) सन दर्शक संख्येच्या एकक व दशक स्थानावर शून्य असेल तर त्या संख्येला 400 ने नि:शेष भाग गेल्यास ते लीप वर्ष असते. उदा. 1600, 2000,  ही लीप वर्षे आहेत;  परंतु सन  1700, 1800, 1900..... ही लीप वर्षे नाहीत.

4) लीप वर्ष हे 4 किंवा 8 वर्षांनी येते.

5) लीप वर्षात इंग्रजी दिनदर्शिकेतील फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात.

6) लीप वर्षात भारतीय सौर वर्षातील चैत्र महिन्यात 30  ऐवजी 31 दिवस असतात.

7) 1 जानेवारीचा जो वार असतो, तोच वार एका वर्षात 53 वेळा येतो.  मात्र लीप वर्षात 1 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात.

8)  लीप वर्ष नसतान प्रजासत्ताक दिनी जो वार असतो त्याच्या मागील दुसरा वार त्याच वर्षीच्या स्वातंत्र्य  दिनी असतो व लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिनी  जो वार आहे त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनी असतो.

👉  5 वेळा येणारे वार :

महिना एकूण दिवस
5 वेळा येणारे वार?
28
एकही वार 5 वेळा येत नाही.
29
1 तारखेचा वार 5 वेळा येतो.
30
1 2 तारखेचा वार 5 वेळा येतो.
31
1,2 3 तारखेचा वार 5 वेळा येतो.

👉 विशेष:
1 ) एकाच वर्षात स्वातंत्र्य  दिन (15 ऑगस्ट),  टिळक पुण्यतिथी (1 ऑगस्ट), बालदिन (14 नोव्हेंबर) व शिक्षक दिन (5 सप्टेंबर) एकाच वारी येतात.

2)  एकाच वर्षात नाताळ (25 डिसेंबर), म.गांधी जयंती (2 ऑक्टोंबर), शाहू जयंती (26 जून), महाराष्ट्र दिन (1 मे)  हे सर्व एकाच वारी येतात.

👉 दिनविशेष:
बालिका दिन :            3 जानेवारी
मराठी भाषा दिन :         27 फेब्रुवारी
महाराष्ट्र दिन :                     1 मे
शिक्षक दिन :             5 सप्टेंबर
नाताळ :                 25 डिसेंबर
प्रजासत्ताक दिन :          26 जानेवारी
विज्ञान दिन :             28 फेब्रुवारी
स्वातंत्र्य  दिन :             15 ऑगस्ट
बालदिन :                14 नोव्हेंबर
लोकमान्य टिळक पुण्यतिथी :   1 ऑगस्ट





No comments:

Post a Comment