या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

सूर्यफूल एक औषधी वनस्पती

           सूर्यफूलची उन्हाळी लागवड पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी केली जाते. सध्या याचे प्रमाण कमी असले तरी सूर्यफूल हे एक औषधी वनस्पतीअसून याचे तेल आहारास उत्तम आहे.
       

        सूर्यफूल हे मुळचे अमेरिकेतील असून रानटी झुडूप अवस्थेमध्ये  आढळते.सुर्याफुलामध्ये दोन जाती आढळतात.  व्युस.हे.अर्गेफ़िलसवहेडेबिलिस या प्रकारचे आहे.  यामधील दोन्ही जाती पेरू किवा अन्य देशांमध्ये शोभेची फुले म्हणून लागवड करतात.   भारत, रशिया, इजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड केली जाते. अमेरिका, चीन, आस्ट्रेलिया, आफ्रिका, इटली, जर्मनी या देशामध्ये ओला चारा  यापासून तयार केला जातो. सुर्यफूलापासून लोणीही तयार केले जाते.   सूर्यफुलाच्या टरफलापासून पेक्टीज, अल्कोहोल , फुरफुराल  इत्यादी रसायने व इंधनेही  तयार करता येतात.  अंग मालिशसाठी तेलाचा वापर केला जातो. गराचा वापर लकवा,  पुळी इत्यादीवर लेप देण्यासाठी केला जातो.  तेलाचा उपयोग रंग, रोगण, प्लास्टिक आदी बनविण्यासाठी केला जातो.  सूर्यफुलाच्या खोडापासून रेशमासारखा तलम धागा मिळतो, रशियासारख्या देशात मोठया बिया मीठ लावून भाजून खातात. 
        सूर्यफूल वर्षातून दोनवेळा घेता येते.  खरीप हंगामामध्ये पेरणी करता येते.  पावसाळा  समाप्तीला सूर्यफूल  काढणीस येते.  ७० ते ८० दिवसांत पेरणीपासून याची काढणी होते.  रब्बी हंगामामध्ये  सूर्यफुलाचे पीक घेता येते.  बियाण्यात तेलाचे प्रमाण अधिक असल्याने तेलासाठी याचा अधिक वापर होतो.  पीकाच्या वाढीसाठी कोणत्याही तापमानाचा यावर परीणाम होत नाही.  एकंदरीत औषधी वनस्पती म्हणून सूर्यफूलाची लागवड फायदेशीर आहे.