या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

आलंकारिक शब्द



अलंकारिक शब्द

अकरावा रुद्र  अतिशय तापट माणूस

अकलेचा कांदा  मूर्ख माणूस

अष्टपैलू  सर्वगुण संपन्न

अरण्यरुदन  ज्याचा काही उपयोग नाही असे कृत्य

अमरपट्टा  अमरत्वाचे आश्वासन

अक्षर शत्रू  अडाणी

ओनामा  प्रारंभ

उंटावरचा शहाणा  – मूर्खपणाचा सल्ला देणारा

उंबराचे फूल  दुर्मिळ वस्तु

उडते पाखरू  अस्थिर मनाचा

अडेल तट्टू  हट्टी माणूस

आग्या वेताळ  अत्यंत रागीट मनुष्य

अंधेरनगरी  अव्यवस्थितपणाचा कारभार

कपिलाषष्ठीचा योग  दुर्मिळ योग

कळीचा नारद  भांडण लावणारा

काडी पैलवान  हडकुळा

कुंभकर्ण  झोपाळू

कर्णाचा अवतार  उदार, दानशूर

कुबेर  खूप श्रीमंत माणूस

कैकयी  दुष्ट स्वभावाची स्त्री

कोल्हेकुई  क्षुद्र लोकांचा गलबला

खडाजंगी  मोठे भांडण

खुशाल चेंडू  चैनखोर माणूस

खेटराची पूजा  अपशब्द वापरणे

खोगीर भरती  निरुपयोगी माणसांचा समूह

गंगायमुना  डोळ्यातले अश्रू

गंडातर  मोठे संकट

गारुडी  सापांचा खेळ करणारा

गुळाचा गणपती  मंद बुद्धीचा

गोगलगाय  निरुपद्रवी माणूस

गुलाबाचे फुल  नाजुक स्त्री

घर कोंबडा  घरा बाहेर न पडणारा

घर भेद्या  गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा

घटकेचे घड्याळ  क्षणभंगुर

चरपट पंजरी  निरर्थक बडबड

चिटणीस  पत्रव्यवहारासारखे काम करणारा शासकीय अधिकारी

चाकरमाने  शहरात कायमस्वरूपी नोकरी करणारे मध्यमवर्गीय

चाणक्य  कारस्थानी माणूस

चंडिका  कजाग स्त्री

चामुंडा  भांडखोर स्त्री

चाणक्य  कारस्थानी माणूस

चंडिका  कजाग स्त्री

चामुंडा  भांडखोर स्त्री

चौदावे रत्न  मोर

छत्तीसचा आकडा  वैरभाव, शत्रुत्व

जागल्या  रात्री पहारा देणारा

जमदग्नीचा अवतार  रागीट स्वभावाचा

जिप्सी  भटकंती करणारा

जर्जर  अशक्त, म्हतारा

जडभरत  सुस्त, आळशी

झारीतील शुक्राचार्य  आपली परंतु आपणास गुप्तपणे अडचणीत आणणारी माणसे

टोळ भैरव  गावगुंड

ताटाखालचे मांजर  दुसर्‍यांच्या विचाराने वागणारा

त्रिकूट  तिघांचा समुदाय

तिरकमशेट  चकणा माणूस

दगडावरची रेघ  खोटे न ठरणारे शब्द

दुर्वास  शीघ्रकोपी

दरवेशी  अस्वलाचा खेळ करणारा

देवमाणूस  सज्जन

देवजी धसाडा  करूप वं अडदांड माणूस

धन दांडगा  संपतीमुळे शेफारलेला

धोपट मार्ग  नेहमीचा सरळ मार्ग

नवकोट नारायण  खूप श्रीमंत

नखशिखांत  सर्व शरीरभर

नंदीबैल  सांगकाम्या, अक्कल शून्य

नरसिंह  उग्र व पराक्रमी

पर्वणी  दुर्मिळ योग

पाप्याचे पित्तर  सडपातळ माणूस

पाताळ यंत्री  धोरणी माणूस

पंक्ती प्रपंच  पक्षपात

पिकलं पान  म्हातारा

पोतराज  आंगावर चाबाकाचे फटके मारून कला दाखवणारा

पोपटपंची  अर्थ न समजताच पाठ करणारा

बहूभाषा कोबिद  अनेक भाषांचे ज्ञान असणारा

बुरूड  कामटयापासून सूप, टोपल्या बनवणारा

बहुरूपी  विविध रुपे घेऊन मनोरंजन करणारा

बहूश्रुत  भरपूर ऐकलेला वं माहिती असणारा

बृहस्पती  खूप हुशार

बिनभाड्याचे घर  कारागृह  

बोलाचीच कढी  केवळ शाब्दिक वचने

भाकड कथा  निरर्थक गोष्टी

भडभुंजा  पोहे, मुरमुरे इ. विकणारा

भोजनभाऊ  ऐतखाऊ माणसे

भिष्मप्रतिज्ञा  कठीण प्रतिज्ञा

मंथरा  दृष्ट स्वभावाची स्त्री

मारूतीचे शेपूट  लांबत जानरे काम

मृगजळ  फक्त भास

मुमुक्ष  मोक्षप्राप्तीची इच्छा धरणारा साधक

मेघश्याम  ढगासारखा सावळा

मुक्ताफळे  वेडेवाकडे बोल

मगरमिठ्ठी  घट्टपकड

यूयुत्सु  लढाईची इच्छा बाळगणारा

यमपुरी  तुरुंग

योगिनी  योगाभ्यास करणारी स्त्री

याज्ञिक  धर्मसंस्कार विधी करणारा

युगप्रवर्तक  नवे युग निर्माण करणारा

रत्नपारखी  जडजवाहिरांची पारख करणारा

रडतराऊत  नेहमी रडगाणे गाणारा

राजा हरिशचंद्र  सत्यवचनी माणूस

रांडकारभार  बायकी कारभार

रामबाण  खात्री लायक उपाय, इलाज

रुपेरी बेडी  चाकरी 

लंकेची पार्वती  अंगावर दागिने नसलेली स्त्री

वाकनिस – वाड्यातील मालमत्तेची सर्व व्यवस्था पाहणारा

व्यासंगी  भरपूर ज्ञानग्रहण करणारा

वासुदेव  रामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा

वाघ्या-मुरळी  खंडोबाच्या नावाने सोडलेलेल पुरुष व स्त्री

विदूषक  सर्कशीत हास्य विनोदाव्दारे मनोरंजन करणारा

वैष्णव  विष्णूची उपासना करणारा

शिरस्तेदार  कचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून

शैव  शंकराचा उपासक

सांडणीस्वार  उंटावरून टपाल पोहोचवणारा

सारथी  रथ चालविणारा

सोंगाड्या  वगनाट्यात विविध भूमिका करणारा

साबांचा अवतार  अत्यंत भोळा माणूस

सत्तीचे वाण  दृढनिश्चय

सुळावरची पोळी  जिवावर बेतणारे काम

हरीचा लाल  विशेष व्यक्ति

हरीशचंद्र  सत्यवचनी माणूस

हिंगाचा खडा  त्रासदायक माणूस



No comments:

Post a Comment