वाक्प्रचाराचे वाक्यात उपयोग |
अटक करणे :- खूप परिश्रम करून
पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली. |
अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी
रागाने अपशब्द वापरले. |
अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी
प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले. |
अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या
मुलाला अचंबा वाटला. |
अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत
सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला. |
अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन
करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला. |
अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे
वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते. |
अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या
माणसांचे अनुकरण करतात. |
अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध
चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला. |
अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही
विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले. |
अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या
ज्ञानावर अवलंबून असतो. |
अवगत होणे :- एक महिने अभ्यासाने
कॉम्प्युटर कसा चालवावा, याची कला राजेशला अवगत झाली. |
अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन
घाबरला होता; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले. |
अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले
गुण नेहमी अंगी बाळगावेत. |
अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या
चालीरीतींचा अंगीकार केला. |
अंग चोरणे :- आपले अंग चोरून महादूने
मालकांना वाट करून दिली. |
अंत होणे :- पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे
यांचा अंत झाला. |
अंतर ण देणे :- शेठजींनी दामू या आपल्या
नोकराला कधीही अंतर दिले नाही. |
अंदाज बांधणे :- मोहनच्या पडलेल्या
चेहऱ्यावरून तो नाराज झाला आहे, असा आईने अंदाज बांधला. |
आकलन होणे :- काकांनी समजावून सांगितले की, बऱ्याचशा कठीण
गोष्टींचे मला आकलन होते. |
आदर बाळगणे : लहान मुलांनी नेहमी
थोरामोठ्यांचा आदर बाळगावा. |
आनंदाचे भरते येणे : पहिल्यांदा समुद्रकिनारा
पाहिल्यामुळे नीताला आनंदाचे भरते आले. |
आरोळ्या ठोकणे :- क्रिकेटमध्ये जिंकल्यावर मुलांनी
आनंदाने आरोळ्या भोकल्या. |
आव्हान देणे :- गुप्त कारस्थान करणाऱ्या
शत्रूला भारतीय सेनेने आव्हान दिले. |
आयात करणे : जावा-सुमात्रा बेटावरून भारत
मसाल्यांच्या पदार्थांची आयात करतो. |
आवाहन करणे : 'पूरग्रस्तांना मदत करा' असे चाळ कमिटीने
प्रत्येक भाडेकरूला आवाहन केले. |
आळशांचा राजा :- रमेश काहीच काम करत नाही, दिवसभर लोळत असतो. तो म्हणजे आळशांचा
राजा आहे. |
आश्चर्य वाटणे :- या दिवाळीत गावामध्ये
खुप फटाके फुटल्याने मला आश्चर्य वाटले. |
आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- अपंगांची शर्यत
पाहून रोहण आश्चर्याने तोंडात बोटे घातली. |
आश्चर्यचकित होणे :- सर्कशीतील नाचणारा हत्ती बघून
प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. |
आज्ञा पाळणे :- आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा
पाळावी. |
औक्षण करणे :- दिवाळीला अभ्यंगस्नान
केल्यावर आईने मला औक्षण केले. |
इलाज नसणे :- अतिरेक्यांनी भारताचे एवढे नुकसान
केले की त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय सरकारकडे इलाज नव्हता. |
उत्कट प्रेम असणे :- माझे माझ्या शाळेवर उत्कट
प्रेम आहे. |
उत्कंठेने वाट पाहणे :- वाऱ्याच वर्षांनी माहेरी
येणाऱ्या नलूची राधाबाई उत्कंठेने वाट पाहत होत्या. |
उगम पावणे :- त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात गोदावरी नदी
उगम पावते. |
उचलली जीभ लावली टाळ्याला :- राजेश प्रत्येक गोष्टीत
आपल्याला ज्ञान आहे अशीच वागते. म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला. |
उत्तीर्ण होणे :- प्रमोद एम.बी.बी.एस.
परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. |
उदरनिर्वाह करणे :- कमालीचे कष्ट उपसून दामू
आपला उदरनिर्वाह करत होता. |
उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना आई शेतातून
घरी आली. |
ऋण फेडणे :- गरिबांची सेवा करून
प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडले पाहिजे. |
एकजीव होणे :- गावातील रस्ता तयार करताना
गावकऱ्यांनी एकजीव होऊन काम केले. |
एकटा पडणे :- वर्गात वीरुशी कोणी बोलत
नसल्यामुळे तो एकटा पडला. |
एक होणे :- सर्व भारतीयांनी एक होऊन दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे. |
ऐट दाखवणे :- नवीन कपडे घालून छोटा
राजू सर्वांना ऐट दाखवत होता. |
कदर करणे :- बादशहाने बिरबलाच्या
चातुर्याची नेहमी कदर केली. |
करुणा उत्पन्न होणे :- रामूचे दारिद्र्य पाहून
सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली. |
कमाल करणे :- नाटकात सुंदर अभिनय करून
विनिताने अगदी कमाल केली. |
कच खाणे :- माथेरानला दरीत उतरताना चंदूच्या मनाने कच खाल्ली. |
कचरणे :- रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करायला
पर्यटकांचे मन कचरले. |
कपाळमोक्ष होणे :- गच्चीवरून कोसळल्यामुळे गच्चीत
काम करणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला. |
कलाटणी मिळणे :- मधुकर नौदलात भरती झाला
आणि त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली. |
कष्टाचे खाणे :- शेतकरी शेतात राब राब राबतो
व कष्टाचे खातो. |
कळी खुलणे :- आजीने आणलेली सुंदर सुंदर
खेळणी पाहून लहानग्या शीतलची कळी खुलली. |
कंबर कसणे :- भारतमातेला पारतंत्र्याच्या
जोखडातून सोडवण्यासाठी क्रांतीकारकांनी कंबर कसली. |
काबाडकष्ट करणे :- मामीने आपल्या मुलाला
काबाडकष्ट करून शिकवले. |
काटकसर करणे :- तुटपुंज्या पगारात महिन्याचा
खर्च करताना रेखाकाकू काटकसर करत होत्या. |
कातड्याचे जोडे घालणे :- सुरज नोकर
सावकारांना म्हणाला, "माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिलेत, तर मी तुम्हांला
माझ्या कातड्याचे जोडे घालीन." |
काबीज करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी
कुमारवयातच तोरणा गड काबीज केला. |
कागाळी करणे :- सुचिताने पुस्तक फाडले, अशी नीताने आईकडे
कागाळी केली. |
कानात वारे शिरणे :- बऱ्याच दिवसांनी मोकळ्या
मैदानात आणल्यावर कुत्र्याच्या पिलाच्या कानात वारे शिरले. |
कामगिरी करणे :- बाजीप्रभू देशपांडेंनी
पावनखिंड लढवून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी बजावली. |
कालबाह्य ठरणे :- दूरदर्शनच्या वाढत्या प्रसारामुळे
हल्ली रेडिओ कालबाह्य ठरू लागला आहे. |
काहूर उठणे : पृथ्वीवर धूमकेतू आदळणार, या अफवेचे
लोकांमध्ये काहूर उठले. |
कामाचे चीज होणे :- मिडलस्कूल परीक्षेत राहुल
प्रथम आल्यामुळे त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले. |
काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ
बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली. |
काळजी घेणे :- छत्रपती शिवाजी महाराज
आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेत होते. |
काळजात चर्र होणे :- कोसळलेल्या इमारतीची बातमी
वाचून सुनंदाच्या काळजात चर्र झाले. |
काळजाला हात घालणे :- मेधा पाटकर यांनी
धरणग्रस्तांची बाजू कळकळीने मांडून लोकांच्या काळजाला हात घातला. |
कृतघ्न असणे :- स्वतः कष्ट करून राधाबाईने
रामला शिकवले, पण त्यांच्या म्हातारपणी दूर जाऊन तो कृतघ्न ठरला. |
कैद करणे :- शाळेतील मुलांनी अभ्यास
होण्या साठी स्वताला कैद करून घतले. |
किंमत करणे :- पोशाखावरून नाही; पण एखाद्या
माणसाच्या बोलण्यावरून त्याची किंमत करावी. |
कुवत असणे :- न थकता दहा किलोमीटर
धावण्याची राजेशची कुवत होती. |
कुशल चिंतणे :- देवाला नवस करून
कुमारकाकींनी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी कुशल चिंतीले. |
कुरकुर करणे :- सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून राजू दिवसभर
कुरकुर करत होता. |
कुरवाळणे :- संध्याकाळी परतलेल्या गाईला
वासुदेव मायेने कुरवाळतो. |
कूस धन्य करणे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापून जीजामातेची कूस धन्य
केली. |
कोरडे ठणठणीत पडणे :- आमच्या गावचा ओढा भर उन्हाळ्यात कोरडा
ठणठणीत पडतो. |
कौतुक वाटणे :- मुग्धा एवढ्या लहान वयात उत्तम गाते
याचे सर्वांना कौतुक वाटते. |
खजील होणे :- चोरी उघडकीस आल्यावर रामू खजील झाला. |
ख्याती असणे :- उत्तम धावपटू म्हणून पी.टी. उषा यांची
ख्याती आहे. |
खटके उडणे :- मीरा व रमा या जुळ्या बहिणींचे एकाच
वस्तूवरून नेहमी खटके उडतात. |
खळीला येणे :- दहा फेऱ्यांनंतरही निकाल लागला नाही; तेव्हा दोन्ही
पहिलवान खळीला आले. |
खंडाने जमीन घेणे :- शामुकाकांनी इनामदारांची पडिक जमीन
खंडाने घेतली. |
खडान्खडा माहिती :- आमच्या मुख्याध्यापकांना शाळेच्या
कामकाजाची खडान्खडा माहिती आहे. |
खांद्याला खांदा लावून काम करणे :- शाळेचे बांधकाम
करताना गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. |
खेटून उभे राहणे :- लहानगा शरद आपल्या आईला अगदी खेटून उभा
होता. |
खेद प्रदर्शित करणे :- लोकलगाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे
स्टेशन मास्तरांनी प्रवाशांकडे खेद प्रदर्शित केला. |
खेळ रंगात येणे :- शाळेला सुट्टी असते, तेव्हा लहान मुलांचा
खेळ रंगात येतो. |
खोड मोडणे :- हात सोडून सायकल चालवणारा राजू जेव्हा
एकदा सपाटून आपटला, तेव्हा त्याची खोड मोडली. |
गप्पांना भरती येणे :- खूप दिवसांनी काकु घरी आल्यामुळे
त्यांच्या व आईच्या गप्पांना भरती आली. |
गयावया करणे :- चोर स्वताला सोडण्या साठी पोलिसांकडे
गयावया करत होता. |
गलबलणे :- रेल्वे दुर्घटनेतील जखमी प्रवासी पाहून
माणसे गलबलली. |
गर्दी पांगवणे :- पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी झालेली
गर्दी पांगवली. |
गट्ट करणे :- येज्ञेशने डब्यातील ठेवलेले दहा लाडू
एका दमात गडप झाला. |
गस्त घालणे :- चोरीमारी होऊ नये; म्हणून स्टेशनवर
पोलीस गस्त घालत होते. |
गडप होणे :- वाघाला पाहून रानातला हरिणांचा कळप
लगेच गडप झाला. |
गर्भगळीत होणे :- दोन पावलांवर अचानक आलेल्या सापाला
बघून बबन गर्भगळीत झाला. |
गरज भागणे :- शाळेतील वाचनालयामुळे शरदची अभ्यासाची
गरज भागली. |
गहजब उडणे :- गावात वाघ मोकाट सुटला हे ऐकून रात्री
गावात एकच गहजब उडाला. |
गहिवरणे :- वीस वर्षांनंतर आपल्या मुलाला पोटाशी
धरताना पार्वतीकाकू गहिवरल्या. |
गळा घोटणे :- दागिन्यांच्या हव्यासापायी चोराने
रात्री आमच्या शेजारच्या काकूंचा गळा घोटला. |
गाडी अडणे :- एका इंग्रजी शब्दाच्या अर्थापाशी
मधुराची गाडी अडली. |
गांगरून जाणे :- जत्रेतील तुफान गर्दी बघून छोटा बबन
गांगरून गेला. |
गाढ झोपणे :- आईच्या मांडीवर बाळ गाढ झोपला होता. |
गाव गोळा होणे : गरुडीचा खेळ पाहण्यासाठी गाव गोळा
झाला. |
गाडून घेणे :- शर्यतीच्या स्पर्धेसाठी दिलीपने
स्वतःला सरावात गाडून घेतले. |
गोंगाट करणे :- शाळेला सुट्टी असल्यामुळे दुपारच्या
वेळी मुले मैदानात गोंगाट करत होतो. |
गौरव करणे :- शालान्त परीक्षेत जिल्ह्यात पहिली
आल्यामुळे मुख्याध्यापकांनी अमृताचा गौरव केला. |
घाम गाळणे :- शेतकरी दिवसभर शेतात घाम गाळतात. |
घायाळ होणे :- झाडावरून खाली पडल्यामुळे चिमणीचे
पिल्लू घायाळ झाले. |
घोकत बसणे :- शेजारचा मधू संस्कृत शब्द घोकत बसला
होता. |
घोकंपट्टी :- उद्या भाषेचा पेपर म्हणून अमित
आजपासूनच घोकंपट्टी करत होता. |
चक्कर मारणे :- मी गावी गेलो की, संध्याकाळी नदीकाठी
चक्कर मारतो. |
चरणांवर मस्तक ठेवणे :- वारीला गेलेले वारकरी
श्रीविठ्ठलमूर्तीच्या चरणांवर मस्तक ठेवतात. |
चाचपडत राहणे :- वीजकपातीमुळे अंधारात म्हातारे भाऊकाका
चाव्यांचा जुडगा हुडकण्यासाठी चाचपडत राहिले होते. |
चांगले दिवस येणे :- मुलगा कामाला लागला आणि दरेकर
कुटुंबाला चांगले दिवस आले. |
चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच गडबड करणारी मुले चिडीचूप झाली. |
चेव चढणे :- शत्रूचे सैन्य दिसताच भारतीय जवानांना
चेव चढला. |
छाया शोधणे :- भर उन्हात चालता चालता चालता महेश दमला
व छाया शोधू लागला. |
जग कळणे : वयाच्या दहाव्या वर्षीच महादूला |
जाहीर करणे :- उद्या पाणी येणार नाही, असे
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले. |
जिवाचे सोने होणे :- दोन्ही मुले चांगली शिकल्यामुळे
काशीबाईंच्या जिवाचे सोने झाले. |
जीवदान देणे :- महाराजांनी रायरीच्या पाटलांना जीवदान
दिले. |
जीवावर येणे :- वीस माणसांचा स्वयंपाक करणे, हे राधाबाईच्या अगदी
जीवावर आले. |
जीव मेटाकुटीला येणे :- रात्रभर काम करून सीताकाकूंचा जीव
मेटाकुटीला आला. |
जीव सुखावणे :- मुलगा स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आला, हे ऐकून
स्वातीबाईंचा जीव सुखावला. |
झडप घेणे :- घारीने कोंबडीच्या पिलांबर वरून झडप
घेतली. |
डोक्यावरचे ओझे उतरणे :- पुरामध्ये रामरावाचे घर वाहून गेले
नाही, असे कळताच त्यांच्या भावाच्या डोक्यावरचे ओझे उतरले. |
डोळा चुकवणे :- लहानगा राजू आईचा डोळा चुकवून खेळायला
गेला. |
डोळे भरून येणे :- परदेशात चाललेल्या विनयला पाहून आईचे
डोळे भरून आले. |
डोळे ओले होणे :- चित्रपटातील करुण प्रसंग पाहताना
प्रेक्षकांचे डोळे ओले झाले. |
डोळे पाण्याने डबडबणे :- सासरी निघालेल्या मुलीला निरोप देताना
राधाकाकुंचे डोळे पाण्याने डबडबले. |
डोळ्यांत पाणी येणे :- ताईला सासरी धाडताना आईच्या डोळ्यांत
पाणी आले. |
डोळ्यांतून टिपे गळणे :- दहा वर्षांनी आईने संजयला पाहिले आणि
तिच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली. |
डोळ्यांवर येणे :- क्रांतिकारकांनी केलेले गुप्त कट ब्रिटिश
पोलिसांच्या डोळ्यांवर आले. |
डोळे दिपणे :- इंद्रधनुष्य पाहून नीताचे डोळे दिपले. |
डोळे पुसणे :- मदर तेरेसांनी कित्येक दुःखितांचे डोळे
पुसले. |
तणतणणे :- मधुराला आईने सहलीला जाऊ दिले नाही; म्हणून ती आईवर
तणतणली. |
तडे पडणे :- पाऊस न पडल्यामुळे आमच्या गावातील शेतजमिनीला तडे
पडले. |
तहानभूक हरपणे :- खेळायला मिळाले, की राजेशची तहानभूक हरपते. |
तर्क करणे :- बंडू पुण्याला गेलाय म्हणजे नक्कीच आत्याकडे
गेला असणार, असा अमरने तर्क केला. |
तडाखा बसणे :- गेल्या वर्षी गावाला महापुराचा तडाखा बसला. |
ताजेतवाने होणे :- सकाळच्या हवेत फिरून आल्यावर मी ताजातवाना झालो. |
ताण येणे :- उद्या होणाऱ्या मिडलस्कूल स्कॉलरशिप परीक्षेचा
मीनाच्या मनावर ताण आला. |
तावडीतून सुटणे :- हिसका मारून चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला. |
ताप सरणे :- पहिला पाऊस पडताच जमिनीचा ताप सरला. |
ताब्यात देणे :- कट्टर अतिरेक्याला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात
दिले. |
तांबडे फुटणे :- तांबडे फुटले की शेतकरी शेतामध्ये कामाला
जातात. |
तोंडचे पाणी पळणे :- रानामध्ये दोन पावलांवर अचानक मोठा साप बघून
सहलीला गेलेल्या मुलांच्या तोंडचे पाणी पळाले. |
तोंडघशी पडणे :- कोलांट्या उद्या मारता मारता मधू तोंडघशी पडला. |
तोंडातून चकार शब्द न काढणे :- सर राजेशवर रागावले, तेव्हा त्याने
तोंडातून चकार शब्द काढला नाही. |
तुच्छ वाटणे :- अभ्यासापुढे संजयला खेळणे तुच्छ वाटते. |
तुडुंब भरणे :- पावसामध्ये आमच्या गावची विहीर तुडुंब भरते. |
त्रेधा-तिरपीट उडणे :- संध्याकाळी येणारे पाहुणे सकाळीच
आल्यामुळे मंदाची त्रेधा-तिरपीट उडाली. |
त्याग करणे :- गांधीजींच्या आदेशानुसार सर्व अनुयायांची विदेशी
कपड्यांचा त्याग केला. |
थक्क करणे :- एकापाठोपाठ एक असे शंभर सूर्यनमस्कार करून
रामूने सर्वांनाच थक्क केले. |
थट्टा करणे : सर्व दोस्तांमध्ये राजू बुटका असल्यामुळे सगळे
त्याची थट्टा करत. |
थाप मारणे :- सिनेमा बघायला गेलेल्या सुधीरने 'मी मित्राकडे अभ्यास
करत होतो,' अशी आईला थाप मारली. |
थारा देणे :- अकबर बादशहाने सर्व कलावंतांना दरबारात थारा दिला. |
दगा न देणे :- चांगल्या मित्राला कधीही दगा देऊ नये. |
दर्शन घेणे :- आग्र्याला जाऊन आम्ही ताजमहालाचे दर्शन घेतले. |
दाद मागणे :- आपल्यावर झालेल्या अन्यायाची रामरावांनी कोर्टात
दाद मागितली. |
दिवस रेटणे :- पतीचे निधन झाल्यावर काशीबाईनी कसे तरी दिवस रेटले. |
दिलासा देणे :- बॉम्बस्फोटामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना
प्रंतप्रधानांनी दिलासा दिला. |
दुजोरा देणे :- हिवाळ्यात सहल काढायची, या गुरुजींच्या
म्हणण्याला वर्गातील सर्व मुलांनी दुजोरा दिला. |
देखरेख करणे :- रात्री आमचा वॉचमन सोसायटीची देखरेख करतो. |
देवाणघेवाण करणे :- धर्मपरिषदेमध्ये प्रतिनिधींनी
एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली. |
देह झिजवणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारताच्या
स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला. |
देहभान हरपणे : पावसात भिजताना मुले देहभान विसरतात. |
धड न समजणे : शाळेत आलेले परदेशी पाहुणे काय बोलत होते ते आम्ही
मुलांना धड समजत नव्हते. |
धडा शिकवणे :- पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला. |
धन्य होणे :- देवाचे दर्शन होताच संत नामदेव धन्य झाले. |
धडे देणे : रामभाऊंनी मुलाला मोठ्या माणसांशी कसे नम्रतेने वागावे, याचे धडे दिले. |
धपाटे घालणे :- उजळणी आली नाही की माझे मामा पाठीत धपाटे
घालायचे. |
ध्यास घेणे : लहान वयातच राहुलने बुद्धिबळपटू होण्याचा ध्यास
घेतला. |
धारण करणे :- लहानपणच्या नरेंद्राने मोठेपणी स्वामी विवेकानंद हे
नाव धारण केले. |
धाडस दाखवणे :- मनोहरने एकट्याने विहिरीत उडी मारण्याचे धाडस
दाखवले. |
धाप लागणे :- धावण्याच्या शर्यतीत जोरात धावल्यामुळे रोहितला
धाप लागली. |
धूम धावत सुटणे :- शाळा सुटताच मुले धूम धावत सुटली. |
नक्कल करणे :- स्नेहसंमेलनात उदयने सरांची अगदी हुबेहूक नक्कल केली. |
नजर ठेवणे :- अतिरेक्यांच्या कारवायांवर पोलिसांनी नजर ठेवली
होती. |
नवल वाटणे :- अबोल असलेला संजय उमेशची तक्रार करताना भडाभडा
बोलताना पाहून त्याच्या आत्याला नवल वाटले. |
नजर चुकवणे : आईची नजर चुकवून राजू खेळायला गेला. |
नमूद करणे : पुण्याला सोळा सेंटिमीटर पाऊस पडला, असे वेधशाळेने उमूद
केले. |
नाव गाजने : सचिन तेंडुलकरमुळे साऱ्या जगात भारताचे नाव गाजले. |
नाशवंत असणे :- या जगात कोणतीही गोष्ट अमर नाही, ती नाशवंत आहे. |
निरीक्षण करणे : मी काढलेल्या चित्राचे बाईंनी निरीक्षण केले. |
निष्ठा असणे : मोहितची आपल्या गुरुजींच्या बुद्धिमत्तेवर खूप
निष्ठा होती. |
निपचित पडून राहणे :- दोन दिवस आलेल्या तापामुळे लहानगे बाळ
निपचित पडून होते. |
पदवी देणे : वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांना 'सर' ही पदवी देण्यात
आली. |
पर्वा नसणे : क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्रासाठी
आपल्या जीवाची पर्वा केली नाही. |
पश्चात्ताप होणे : ज्या खंडूने वर्गात पहिला नंबर काढला, त्या खंडूला आपण
खेडवळ म्हणून हसलो होतो याचा सलीलला पश्च्यात्ताप झाला. |
पंखात वारं भरणे :- शालान्त परीक्षेनंतर आय.टी. क्षेत्रात चमकायचे, या विचाराने
संदीपच्या पंखात वारं भरलं. |
पाया पडणे : संध्याकाळी हातपाय धुऊन देवाच्या पाया पडावे. |
पाय ओढणे :- सगळ्यांनी एकदम प्रगती करावी, कोणीही कुणाचे पाय
ओढू नयेत. |
पायाशी बसणे :-गावी गेलो की, माझे बाबा नेहमी आजोबांच्या पायाशी
बसत. |
पार पडणे :- गेल्या आठवड्यात आमच्या शाळेचे स्नेहसंमेलन पार
पडले. |
पाळेमुळे खोल रुजणे :- गाव सोडताना आईला दु:ख झाले; कारण या गावाच्या
संस्कृतीत तिची पाळेमुळे खोल रुजली होती. |
पोट भरणे : महादू दिवसरात्र कष्ट करून आपले पोट भरतो. |
पोटाला चिमटा घेणे : पोटाला चिमटा घेऊन काकूंनी राजला उच्च शिक्षण
दिले. |
पोशिंदा असणे : साऱ्या मराठमोळ्या रयतेचे छत्रपती शिवाजी
महाराज पोशिंदा होते. |
प्रत्युत्तर देणे : बाबांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला
श्याम प्रत्युत्तर देत होता. |
प्रसंग बेतणे : पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचा प्रसंग
बेतला. |
प्रविष्ट होणे :- सत्यनारायणाची महापूजा घातली आणि नंतरच सर्वजण
नवीन घरात प्रविष्ट झाले. |
प्राणाचे बलिदान करणे :- भारताच्या स्वातंत्र्यासाठी
अनेक क्रांतिकाराकांनी प्राणाचे बलिदान केले. |
पाय धरणे : हातून घडलेल्या चुकीबद्दल बबनने राकाशेटचे पाय धरले. |
प्रेमाचा भुकेला असणे :- अनाथाश्रमातील मुले प्रेमाची भुकेली
असतात. |
पिंगा घालणे :- मंगळागौरी खेळताना माहेरी आलेल्या सुमनने
सुंदर पिंगा घातला. |
फावला वेळ मिळणे : फावला वेळ मिळाला की, माझी आई वाचन करते. |
फेरफार करणे :- मी लिहिलेल्या निबंधामध्ये गुरुजींनी फार
चांगले फेरफार केले. |
फिर्याद करणे : जमिनीच्या संबंधात दामूकाकांनी शेजाऱ्यावर फिर्याद
केली. |
बहुमान मिळणे : आंतरशालेय स्पर्धेत सर्वाधिक बक्षिसे पटकावणाऱ्या
उमाला स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. |
बडगा दाखवणे :- चोरांनी गुन्हा कबूल करावा म्हणून पोलिसांनी
त्यांना कडक शिक्षेचा बडगा दाखवला. |
बळकटी येणे :- संदर्भग्रंथांचे वाचन करून वक्त्याच्या
विचारांना बळकटी येते. |
बाजूस सारणे :- ओजस्वीने टेबलावरचे दप्तर बाजूला सारले. |
बारा महिने तेरा काळ :- वामनरावांची देवपूजा अगदी बारा महिने
तेरा काळ सुरूच आसरे. |
बाजार भरणे :- सुट्टीमध्ये मामाच्या घरी आम्हा पोरांचा बाजार भरला
होता. |
बालेकिल्ला असणे :- अकोला शहर हे तर उमेदवार विष्णुपंतांचा
बालेकिल्ला होता. |
बावचळणे :- समोरून अचानक आलेला हत्ती पाहून अनुश्री एकदम
बावचळली. |
बुचकळ्यात पडणे :- आईला अचानक रडताना पाहून मोहन बुचकळ्यात
पडला. |
बेभान होणे :- मोठ्या भावाच्या वरातीमध्ये रघू बेभान होऊन नाचला. |
भाळी असणे :- दिवसभर काबाडकष्ट करणे हेच आमच्या आजीच्या भाळी होते. |
भांबावून जाणे :- आईचे बोट सुटल्यामुळे जत्रेमध्ये गर्दीत
छोटा राहुल भांबावून गेला. |
भीतीने थरथरणे : विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वर काढले, पण तो भीतीने थरथरत
होता. |
भुकेने तडफडणे : तीन दिवस उपाशी असल्यामुळे भिकारी भुकेने तडफडत
होता. |
भुलून जाणे : ते सुंदर निसर्गचित्र पाहून सरिता भुलून गेली. |
भूल पडणे : राजेशनने काढलेली सुंदर चित्रे बघून सोहनच्या मनाला भूल
पडली. |
भेदरणे :- विहिरीत पडलेले मूल खूप भेदरले होते. |
मन रमणे : कुमारचे पोहण्यात मन रमते. |
मन उचंबळणे :- गोव्याचा मोठा समुद्रकिनारा पाहून स्मिताचे मन
उचंबळले. |
मनाई असणे : भर पावसात बोटींना खोल समुद्रात जाण्यास मनाई असते. |
मशागत करणे : चांगले पीक येण्यासाठी शेतकरी आपल्या शेतांची
मशागत करतात. |
मस्तक आदराने लवणे : स्वांतत्र्यवीरांच्या कहाण्या ऐकताना आपले
मस्तक आदराने लवते. |
माघार घेणे : भारतीय सैन्याने चाल केल्यामुळे शत्रूच्या सैनिकांनी
माघार घेतली. |
मान डोलवणे : सहलीला यायचे का, असे राजूला विचारताच त्याने मान
डोलवली. |
मातीजमा होणे :- पिकांवर रोग पडल्यामुळे शेतातील पिके एकेक
करून मातीजमा झाली. |
मान खाली घालणे :- पोलिसांनी धमकावताच चोराने मान खाली घातली. |
मान देणे :- आमच्या सरांना गावातील लोक खूप मान देतात. |
मान हलवणे :- 'सहलीला जायचे ना' असे गुरुजींनी विचारताच सर्वांनी मान हलवली. |
मुक्त करणे : गुन्हा शाबित न झाल्यामुळे न्यायालयाने चोराला
मुक्त केले. |
मुलूख थोडा करणे :- गावात दुष्काळ पडल्यामुळे गावकऱ्यांनी मुलूख
थोडा केला. |
मृत्यू पावणे : जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी मृत्यू
पावतो. |
मोह होणे : देवासमोरचे लाडू चोरण्याचा स्वप्नीलला मोह
झाला. |
मौन पाळणे : शैलाने विवेकानंद जयंतीला दिवसभर मौन पाळले होते. |
याचना करणे :- दोन घासांसाठी रस्त्यावरचा भिकारी
येत्या-जात्या माणसाकडे हात पसरून याचना करत होता. |
येरझारा घालणे :- रात्री अकरा वाजून गेले तरी मधू घरी परतला नाही, म्हणून बाबा अंगणातच
येरझारा घालत होते. |
रक्त उसळणे :- शत्रूवर हल्ला करण्यासाठी सैनिकांचे रक्त
उसळले. |
रद्द करणे :- अतिवृष्टीमुळे गुरुजींनी वर्षासहल रद्द केली. |
रद्द होणे :- निवडणुकीमुळे एक मार्चला होणारी शालान्त परीक्षा
रद्द झाली. |
रमून जाणे : सुरेश खेळात नेहमी रमून जातो. |
रवंथ करणे :- दुपारी झाडाच्या सावलीत गाईगुरे रवंथ करत बसतात. |
रंगात येणे :- मधूकाका व अण्णा यांचा पत्त्यांचा डाव
रंगात आला होता. |
-हास होणे :- शिक्षणापासून वंचित
राहिल्यामुळे पूर्वीच्या समाजाचा खूप -हास झाला. |
राग येणे :- चंदूने पुस्तक फाडले म्हणून राजीवला त्याचा राग
आला. |
राजी असणे :- रडणाऱ्या महेशला सर्कसला जाऊया, म्हणताच तो पटकन
राजी झाला. |
राब राब राबणे :- महादू हमालीचे काम करताना रात्रंदिवस राब राब
राबतो. |
रूढ होणे :- 'स्टेशन' हा इंग्रजी शब्द मराठीत अगदी रूढ झाला आहे. |
रुसून बसणे :- आईने खाऊ दिला नाही म्हणून संजय रुसून बसला. |
लगबग असणे :- शेजारच्या काकूंच्या घरात मुलीच्या लग्नाची
लगबग होती. |
लाभ होणे :- शिवरामकाकांना लॉटरी लागून अचानक पैशांचा लाभ झाला. |
लुप्त होणे :- आकाशात दाटून आलेल्या ढगांमध्ये चंद्र लुप्त झाला. |
लौकिक मिळवणे : स्वातीने उत्कृष्ट टेनिस खेळून जगात लौकिक मिळवला. |
वचन देणे :- मी कधीही नापास होणार नाही, असे अमितने आईला वचन
दिले. |
वर्गवारी करणे :- निबंध-स्पर्धेसाठी सरांनी वयोगटाप्रमाणे
मुलांची वर्गवारी केली. |
वाटेकडे कान लावून बसणे :- आई खाऊ घेऊन येईल, या आशेने दोन लहान
मुले उंबरठ्यातच आईच्या वाटेकडे कान लावून बसली होती. |
वाईट वाटणे :- सुरेश नापास झाल्यामुळे रमेशला वाईट वाटले. |
वाळीत टाकणे :- पंचायतीने दिलेला निर्णय पाळला नाही, म्हणून गावाने
सोसवार कुटुंबाला वाळीत टाकले. |
विचार कृतीत उतरवणे :- महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा
काढून आपले विचार कृतीत उतरवले. |
विचारपूस करणे : सुट्टीत आम्ही कोकणात आत्याकडे गेलो तेव्हा तिने
आमची विचारपूस केली. |
विचारविनिमय करणे :- परेशला कोणत्या महाविद्यालयात
घालायचे, याबद्दल त्याच्या आईवडिलांनी विचारविनिमय केला. |
विचारात बुडून जाणे :- प्रमोदच्या समोर येऊन उभा राहिलो तरी
त्याचे माझ्याकडे लक्ष गेले नाही, एवढा तो विचारात बुडून गेला होता. |
विसर पडणे :- पाश्चिमात्य पद्धतींचा अंगीकार करताना जुन्या
चांगल्या प्रथांचा आम्हांला विसर पडला आहे. |
विळखा घालणे :- अफझलखानाच्या सैन्याने प्रतापगडला विळखा
घातला. |
विश्रांती घेणे : दुपारच्या वेळी माझे बाबा विश्रांती घेतात. |
वेष पालटून फिरणे : पूर्वीचे राजे लोकांचे सुखदुःख जाणून
घेंण्यासाठी आपल्या राज्यातून वेष पालटून फिरायचे. |
वेळ वाया जाणे : वेळ हे धन आहे; ते वाया जाऊ देऊ नये. |
वैषम्य वाटणे :- आंधळ्या म्हातारीला आपण रस्ता पार करायला मदत केली
नाही, याचे सदूला वैषम्य वाटले. |
व्याख्यान देणे : बाबा महाराज सातारकरांनी शाळेच्या पटांगणात 'ज्ञानेश्वरी' वर व्याख्याने दिली. |
शब्द देणे : मी कधीच नापास होणार नाही, असा आशिषने आईला शब्द
दिला. |
शब्द फिरवणे : महात्मा गांधीना दिलेला शब्द कस्तुरबांनी एकदा
फिरवला. |
शब्द मोडणे : पुन्हा शाळेत उशिरा येणार नाही, असे सांगूनही आज
मोहनने गुरुजींना दिलेला शब्द मोडला. |
शब्दाला कृतीचे तारण असणे : निबंध-स्पर्धेत प्रथम क्रमांक
मिळवून सुमनने शब्दाला कृतीचे तारण दिले. |
शड्डू ठोकणे :- रिंगणात उतरताच रघू पहिलवानाने प्रतिस्पर्ध्यासमोर
शड्डू ठोकला. |
शरमिंदा होणे :- रामुकाकांकडे पुन्हा पैसे उसने मागताना दामू
शरमिंदा झाला. |
शान वाढवणे :- १९८३ साली क्रिकेटचा विश्वचषक जिंकून कपिलदेवने
भारताची शान वाढवली. |
शिफारस करणे : रवीतात्याने आपल्या दोस्ताकडे उमेश चांगले काम
करतो, अशी शिफारस केली. |
शिकवण देणे :- 'स्वच्छता हा परमेश्वर आहे,' अशी महात्मा गांधींनी
आपल्याला शिकवण दिली. |
शिगेला पोहोचणे :- 'असंभव' मालिकेत शास्त्र्यांच्या
वाड्याचे काय होणार, याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली. |
शिंग फुंकणे :- जुलमी इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी
शिंग फुंकले. |
शीण घालवणे :- कामावरून थकून आलेल्या दामोदरपंतांनी फक्कड
चहा पिऊन शीण घालवला. |
शीण येणे :- दिवसभर टेबलावर लिखाणाचे काम करून दामूकाकांना शीण
आला. |
शोषण करणे :- बरेचसे गिरणीमालक कामगारांचे शोषण करत असत. |
सक्रिय सहभाग घेणे :- रक्तदान शिबिरामध्ये गावकऱ्यांनी सक्रिय
सहभाग घेतला. |
सढळ हाताने मदत करणे :- आईने दारी आलेल्या साधूला सढळ हाताने
मदत केली. |
सन्मान करणे :- राज्यात निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक
मिळवल्याबद्दल मुख्याध्यापकांनी रेश्माचा सन्मान केला. |
सर्रास वापरणे :- सुधाकर आपल्या वाडीलभावाचे बूट सर्रास वापरतो. |
सल्ला देणे :- बाबांनी मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसण्याचा
सल्ला दिला. |
सहकार्य करणे :- एकमेकांना सहकार्य करून गावकऱ्यांनी गावातील
रस्ता बांधला. |
सवलत देणे :- गरीब विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी
फीमध्ये सवलत दिली. |
संकल्प सोडणे :- उद्यापासून पहाटे उठून अभ्यास करण्याचा शीलाने
संकल्प सोडला. |
संथा चुकणे :- सर्कस पाहायला गेल्यामुळे रामूची रोजची संथा चुकली. |
संपादन करणे :- डॉ. आंबेडकरांनी परदेशात जाऊन 'बॅरिस्टर' ही पदवी संपादन
केली. |
साथ देणे : वर्ग स्वच्छ करताना मीनाला सविताने साथ दिली. |
सार्थ ठरणे : लता मंगेशकर यांच्याबाबतीत 'गानकोकिळा' ही पदवी सार्थ ठरली. |
सामना करणे :- कोकणातील लोक दारिद्र्याशी सामना करतात. |
साय खाणे :- बालपण कष्टात गेलेल्या मधूचे आता चांगले दिवस
आल्यामुळे तो साय खातो. |
सुतासारखा सरळ करणे : चोराला कडक शिक्षा करून पोलिसांनी त्याला
सुतासारखा सरळ केला. |
सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली. |
सुविधा असणे : ए.टी.एम. बँकेच्या ग्राहकांनी कधीही पैसे
काढण्याची सुविधा आहे. |
सुगावा लागणे :- अतिरेकी काहीतरी घातपात करणार आहेत, याचा पोलिसांना
सुगावा लागला. |
सूर धरणे : कीर्तनाच्या आधी भजनीबुवा गात असताना आम्हीही सूर
धरला. |
सूर मारणे :- कडक उन्हामध्ये नदीकाठावरची मुले नदीमध्ये सूर मारत
होती. |
सेवा करणे : हेमाने आपल्या आजारी आईची मनोभावे सेवा केली. |
सेवा पुरवणे : काही संस्था घरपोच भाजी पाठवण्याची सेवा
पुरवतात. |
स्वप्न साकार करणे : चंद्रावर जाण्याचे माणसाचे स्वप्न साकार झाले. |
सुधारणा होणे : शेतीच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली आहे. |
स्वागत करणे : विवेकानंद जयंतीला आमच्या शाळेत आलेल्या प्रमुख
पाहुण्यांचे मुख्याध्यापकांनी स्वागत केले. |
स्तब्ध राहणे :- तळटळीत दुपारी झाडाची सर्व पाने स्तब्ध राहिली
होती. |
स्मारक बांधणे :- गावासाठी आयुष्यभर झिजणाऱ्या सुधाकरराव
घोरपड्यांचे गावकऱ्यांनी मरणोत्तर स्मारक बांधले. |
स्वाहा करणे :- दामूने समोर ठेवलेल्या परातभर जिलब्या स्वाहा
केल्या. |
हजेरी घेणे : ऑफिसमधून घरी परतल्यावर बाबांनी अभ्यासाबाबत माझी
हजेरी घेतली. |
हवेहवेसे वाटणे : खूप वर्षांनी गावाहून आलेल्या आजीचा सहवास तुषारला
हवाहवासा वाटत होता. |
हद्दपार करणे :- महात्मा फुले यांनी जुन्या जाचक रूढींना
हद्दपार केले. |
हयगय करणे :- पहाटे पहाटे उठून व्यायाम करण्यासाठी सुधीर
हयगय करू लागला. |
हयात सरणे :- इनामदारांच्या वाड्यावर चाकरी करता करता
दामूकाकांची हयात सरली. |
हमी देणे :- या औषधाने उंदीर नक्की मरतील, अशी औषधविक्रेत्याने
रामरावांना हमी दिली. |
हारीने बसणे :- पाऊस पडून गेल्यावर आपले पंख सुकवण्यासाठी कावळे
तारेवर हारीने बसले होते. |
हिंमत देणे :- आजारातून उठलेल्या नितीनला परीक्षेला
बसण्यासाठी सरांनी हिंमत दिली. |
हुकूम करणे :- न्यायाधीशांनी गुन्हेगारांना कोर्टात हजर
करण्याचा पोलिसांना हुकूम केला. |
हुकूमत येणे :-बरीच मेहनत केल्यामुळे मनोजला सफाईदारपणे इंग्रजी
बोलण्यावर हुकूमत आली. |
हुडहुडी भरणे : ऐन हिवाळ्यात महाबळेश्वरला हेमंतला हुडहुडी
भरली. |
हेका धरणे :- सुमितने (बाबांकडे) सुट्टीमध्ये गावाला जाण्याचा
हेका धरला. |
हेटाळणी करणे :- प्रमिलाकाकू आपल्या सावत्र मुलीची सारखी
हेटाळणी करतात. |
क्षमा मागणे :- 'पुन्हा गडबड करणार नाही,' असे म्हणून माधवने
सरांची क्षमा मागितली. |
Pages
- Home
- शासन निर्णय
- संच मान्यता/ सरलडाटा
- MDM DATA
- शालार्थ
- ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा
- स्पर्धा परीक्षा
- सातवा वेतन आयोग नुसार payment
- मतदार यादीत आपले नाव शोधा
- अाधारकार्ड शोधा
- अाॅनलाइन वीज बील भरा
- ई बुक्स
- 10वी व 12वी मार्कशीट
- मराठी विश्वकोश
- महाराष्ट्रातील जात् संवर्ग यादी
- अवकाशवेध
- शाळेचा U-dise क्रं शोधा
- मराठी देशा
- प्रश्नपेढी
- Bank IFSC कोड शोधा
- आठवणीतली गाणी वाचा व ऐका
- स्वनिर्मित शैक्षणिक ॲप्स
- मान्यवरांचे प्रतिक्रिया
- दिनविशेष-दर्शिका
- महाराष्ट्राचे शिल्पकार
वाक्प्रचार phrase
Subscribe to:
Post Comments (Atom)
शब्द संग्रह चांगले
ReplyDelete