या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

प्राचीन शिक्षणपद्धती

गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती !

       कधी एकदा परीक्षा होऊन हा अभ्यास संपेल, असे झाले आहे. मुलांना अभ्यास करून अगदी कंटाळा आला आहे. पाठ्यपुस्तकातील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून मुले अतिशय कंटाळून गेली आहेत. परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला हवे….. असे संवाद परीक्षेच्या काळात घरोघरी पालकांच्या आणि मुलांच्या तोंडून ऐकायला मिळतात आणि हेच तर आजकालच्या अभ्यासक्रमाचे, विज्ञानाचे मोठे अपयश आहे. अभ्यास करून मुले आनंदीत झाली आहेत, असे दृश्य क्वचितच पहायला मिळते.
       याउलट अध्यात्माचे आहे. जरा पूर्वीच्या गुरुकुलाचे दृश्य आठवून पहा.. !, लगेचच आपल्या तोंडवळ्यावर आनंद पसरतो; कारण पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदुधर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना अत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. आता हे सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले आहे.
     अध्यात्मविषयक ग्रंथ, संतांची चरित्रे, देवतांच्या पौराणिक कथा, संतांनी एखाद्या विषयावर केलेले मार्गदर्शन हे कितीही वाचले, प्रतिदिन तेच तेच वाचले, तरी त्यातील प्रतिदिन मिळणार्‍या आनंदात उलट वाढच होत जाते. या वाचनाचा कधीच कंटाळा येत नाही; कारण अशा प्रकारच्या ग्रंथवाचनातून चैतन्य मिळते आणि यातून बुद्धीची शुद्धी होत गेल्याने आनंद मिळत असतो. म्हणून संतांची चरित्रे ही प्रतिदिन वाचली, तरी प्रतिदिन आपल्याला त्यांतील नवीनच अर्थ उमगल्यासारखे वाटते. असे का होते, तर प्रतिदिनाच्या वाचनाने आपल्या देहाची अनुक्रमे स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह अशी आतील शुद्धी होत गेल्याने त्या त्या देहाच्या स्तरावर मनाला आणि बुद्धीला भावणारा संत-चरित्रामधील भावार्थ निराळा असतो; म्हणून प्रतिदिन निराळा आनंद मिळतो.
     विज्ञान हे चैतन्यरहित असल्याने ते विद्यार्थ्यांना पाट्याटाकूपणा शिकवते. हे पाट्याटाकूपण कंटाळा आणणारे असते, म्हणून अशा अभ्यासाचा विद्यार्थ्यांना ताण येतो, तर अध्यात्म मात्र नित्यनूतन आणि चैतन्यमय असल्याने ते भक्तांना, भाविकांना दररोज निराळ्या पद्धतीचा आनंद देते, जसे वाचनात आपण खोल खोल जाऊ तसा आनंद द्विगुणीत होत असल्याचे समाधान आपल्याला लाभते, म्हणूनच संत-चरित्र वाचतांना त्याचा खूप कंटाळा आला आहे, हे कधी एकदा वाचून संपते आहे, असे झाले आहे, अशी वाक्ये कोणाच्याच तोंडून बाहेर पडतांना दिसत नाहीत, याचे कारण म्हणजे संत-चरित्रातील चैतन्य आणि त्यातील संतांचे अनुभूतींचे प्रत्यक्ष बोल !
        मग, चला तर परत एकवार आनंददायी गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती भारतात आणण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि पुढील पिढ्यांना तरी चैतन्याचा आणि यातून मिळणार्‍या देवकृपेचा आनंद देण्यासाठी सज्ज होऊया !

s
प्राचीन काळातील भारताचे शैक्षणिक वैभव !

‘भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थापण्याच्या उद्देशाने सर थॉमस मूनरो या ब्रिटिश अधिकार्‍याने त्या काळी भारताच्या शैक्षणिक स्थितीचे खोलवर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून प्राचीन काळात असलेले भारताचे शैक्षणिक वैभव दिसून येते.
१. सर थॉमस यांचे सर्वेक्षण
१ अ. बंगाल आणि बिहार येथील १ लक्ष ५० सहस्र ७४८ गावांतील शाळा : १ लक्ष
१ आ. वर्ष १८२६ पर्यंत मद्रास प्रांताच्या २१ जिल्ह्यांतील उच्च शिक्षणसंस्था : १०६४
१ इ. बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या उच्च शिक्षणसंस्था : सरासरी १००
मुंबई आणि पंजाब या प्रांतांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्षही वरीलप्रमाणेच होता.
२.प्राचीन भारतातील शिक्षणाची वैशिष्ट्ये !
 अ. समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक सिद्ध करणे ‘पूर्वीच्या काळी शिक्षणासाठी अस्तित्वात असलेली गुरुपरंपरा ही अतीप्राचीन आणि श्रेष्ठपरंपरा असल्याने शिक्षणाची गुणवत्ता (स्तर) उच्चप्रतीची होती. शिक्षण संस्थांचा उद्देश ‘समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक सिद्ध करणे’, हा होता; म्हणून शिक्षण संपल्यानंतर शिक्षणसंस्था पदवीदान समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक योग्यतेप्रमाणे त्यांचा वर्णव्यवसाय निश्चित करत असत. परंपरागत व्यवसायाचे शिक्षण कुटुंबामध्येच मिळत असे.
२ आ. सर्वांगीण व्यवहारिक ज्ञान : पूर्वी शाळांमध्ये धर्मशास्त्र, विधी, ज्योतिषशास्त्र यांसारखे सर्वांगीण व्यवहारिक ज्ञान दिले जात असे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसह त्याच्यामध्ये शिक्षणानंतर एक चांगला नागरिक बनण्याची क्षमता विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले जात असे. त्यासाठी विद्यार्थ्याच्या निवासाची सुविधाही शाळेतच असायची.
२  इ. शिक्षण हे समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करण्याचे माध्यम : शिक्षण हे उदरभरण किंवा अर्थार्जन करण्याचे माध्यम नव्हते. प्रत्येक व्यक्ती स्वतःची पूर्ण क्षमता वापरून समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करत असे; म्हणून कोणत्याही व्यवसायात भ्रष्टाचार, संग्रह करणे किंवा भेसळ इत्यादींचा प्रश्नच उद्भवत नव्हता.’
२ ई. शिक्षणाची आर्थिक बाजू सांभाळणारे राजे आणि त्याची योग्य परतफेड करणारे विद्यार्थी : वैदिक काळापासून राजे-महाराजे आणि शीर्ष स्थानावर असलेले महाजन जागरूकतेने अन् क्रियाशीलतेने शिक्षण व्यवस्थेचा व्यय करत असत. एखाद्या शिक्षणसंस्थेला आर्थिक साहाय्य करणे, हे ऋषीऋणातून मुक्त होण्याचे पुण्यकर्म मानले जात होते. त्यामुळे शिक्षण संस्था राजाच्या अर्थसाहाय्याने चालायच्या; मात्र त्या राजाश्रित नव्हत्या.’

रामराज्यात शिक्षण कसे होते ?

श्रीरामाने स्वतंत्र शिक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण केले होते !
    रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्यावेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. क्रियाशून्य नव्हते. जेव्हा बेकारभत्ता मिळतो तेव्हा क्रियाशून्यता येतेच. त्याकाळी लोक स्वतंत्र होते. कारण, शिक्षण स्वतंत्र होते, शिक्षण राज्याश्रित आणि वित्ताश्रित नव्हते. शिक्षण आणि शिक्षण देणारे दोन्ही पराधीन (गुलाम) असतील, तर त्या शिक्षणातून काय निर्माण होणार ? जे पेरलेले असते तेच उगवते. त्यात भेद होणार नाही.
       श्रीरामाने स्वतंत्र शिक्षण देऊन घराघरात श्रीराम निर्माण केले होते. जेथे शिक्षण राज्याश्रित किंवा वित्ताश्रित असेल, तेथे कधी काळी स्वतंत्र श्वासोच्छ्वास नसेल. तेथे राष्ट्रीय चारित्र्याचे पुनरुत्थान नसेल.
लोकांना विशिष्ट शिक्षण मिळाल्याने ‘राष्ट्रीय चारित्र्य’ उभे राहिले 
      ‘माणसाला केवळ कर्तव्यपरायणच नाही, तर लोभविवर्जितही बनवण्यात आले होते. आपण एकच कर्तव्याचा घोष करीत असतो; पण कर्तव्यपरायणता येत नाही. म्हणून श्रीरामाने लोकांना विशिष्ट शिक्षण देऊन ‘राष्ट्रीय चारित्र्य’ उभे केले होते’.
          समाज आपल्या सुख आणि हिताची कल्पना यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु ते कशा रितीने प्राप्त होते, याची जाणीव त्याला नसते. ही जाण श्रीरामाला पूर्णपणे असल्यामुळे त्याने त्या काळात लोकांना साधनेद्वारे धर्माधिष्ठीत विशिष्ट शिक्षण देऊन ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करणारे शिक्षण दिले होते. त्यामुळे ‘राष्ट्रीय चारित्र्य’ निर्माण झाले होते.

मुलांनो हे अभिमानास्पद वास्तव जाणा !

ब्रिटीशपूर्व काळातील भारत ज्ञानार्जनाच्या, 
म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर असणे 
‘भारतातले ब्रिटीशपूर्व काळातील शिक्षण हे उत्कर्ष होणारे होते. याविषयी युरोपियन प्रवासी व शासनकर्ते यांच्या निःसंदिग्ध साक्षी आहेत. रामस्वरूप यांनी त्यांच्या Education System during Pre-BritishPeriod या प्रबंधात ही चर्चा केली आहे.’
अ. ‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता. आशिया व युरोप मध्ये अग्रणी होता. त्या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्हते. याला प्रमाण म्हणजे मेगॉस्थेनिस (खि.पूर्व. ३०२) हा भारतातला प्रवासी इथल्या शिक्षणाने विलक्षण प्रभावीत झाला. मेगॉस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या दरबारी होता, तो भारतातील ज्ञान व शिक्षण यांची विलक्षण प्रशंसा करतो.
आ. ब्रिगेडियर जनरल अलेक्झांडर वॉकर ख्रिस्ताब्द १७८० ते १८१० पर्यंत हिंदुस्थानात नोकरीला होता. तो सांगतो, `हिदूंइतकी शिक्षणाची ज्वलंत जाण जगातल्या कुठल्याही लोकांना नाही. इ. सार्वत्रिक शिक्षणाची सर्व भारतभर सुव्यवस्था असल्याचे शिक्षणव्यवस्थेचे त्या काळचे युरोपियन निःसंदिग्ध वर्णन करतात. ख्रिस्ताब्द १८२० मध्ये Abbe J. A. Dubois सांगतो, “असे गाव सापडणे कठीण आहे की, जिथे शाळा नव्हत्या. विद्यार्थ्यांच्या गरजा पुरवणारे, त्यांच्या योग्यतेला अनुकूल असे शिक्षण असे.’
इंग्रज भारतात येण्यापूर्वी त्यांच्या देशापेक्षा भारतात साक्षरता होती ! 
       ‘इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये ७ लाख ३२ सहस्र गुरुकुले होते. ९७ टक्के लोक सुशिक्षित होते. त्या वेळी शिक्षणक्रमात १८ विषय हे होते. त्यात आयुर्वेद, योग, आरोग्य, गणित, स्थापत्य अशा अनेक प्रकारच्या विषयांचा समावेश होता.
भारताच्या महान संस्कृतीचे आचरण करणारे पाश्चात्त्य ! 
       पाश्चात्त्य समाज हिंदु धर्माने दिलेली भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, अध्यात्म, श्री भगवद्गीता इत्यादी अनेक बाबींकडे जागतिक देणगी म्हणून पहातो. अलीकडेच ‘युनेस्को’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने जागतिक अभ्यासक्रमात हिंदु धर्मातील तत्त्वे दर्शित करणारी काव्ये स्वीकारली आहेत. ही काव्ये विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी, तसेच युवापिढीतील कुसंस्कार, क्रौर्य आणि दुर्जनता नष्ट करण्यासाठी पूरक ठरतील, असे ‘युनेस्को’ने म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांतील शिक्षणव्यवस्थेत संस्कृत भाषा अन् रामकृष्णादी अवतारांच्या कथांचे धडे अंतर्भूत आहेत. अमेरिकेच्या विद्यापिठात भगवद्गीतेचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला आहे.   
भारतीय शिक्षणप्रणालीची ही शक्ती जाणा !
     ‘विद्यार्थ्यांनी व्रतस्थ असलेच पाहिजे. भारतीय शिक्षण-शास्त्रज्ञांचा तसा कटाक्ष आहे. आहार, केशभूषा, विहारादी बाबतीत कटाक्षाने व्रतस्थ असायलाच हवे. संयम सांभाळलाच पाहिजे. तसेच भारतीय अध्यापन संस्थांचे कठोर नियम होते. तिथे मनमानी नव्हती. मनमानी असेल, तिथे विद्या असंभव व जिथे विद्या, तिथे मनमानी अशक्य !
स्वामी रामतीर्थांसारखा असा दृढ आत्मविश्वास किती आधुनिकांत आहे ? 
     ‘स्वामी रामतीर्थ अत्यंत बुद्धीमान विद्यार्थी होते. त्यांचा आवडीचा विषय होता गणित. शिकत असतांना त्यांचे नाव तीर्थराम होते. एकदा परीक्षेत १३ प्रश्न दिले होते आणि त्यातील केवळ ९ सोडवायचे होते. तीर्थरामाने १३ च्या १३ प्रश्नांची उत्तरे लिहून त्याखाली एक टीप लिहिली. ‘१३ ही उत्तरे अचूक आहेत. कोणतीही ९ तपासावीत.’ असा त्यांचा आत्मविश्वास दृढ होता.’ 
आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनची आवश्यकताच काय ? 
    ‘आमची हिंदु मुले सत्यवचनी युधिष्ठिर आणि श्रीराम यांच्या चरित्रातून सत्याचा महिमा जाणतात. सत्य बोलायला शिकतात. अनृताचा (असत्याचा) तिरस्कार करतात. आम्हाला जॉर्ज वॉशिंग्टनची आवश्यकता काय ?’

‘गुरुशिष्य परंपरा’च अधिक लाभदायी

       १. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदान यांच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञानाच्या म्हणजे परा विद्येच्या समवेतच व्यावहारिक, भौतिक ज्ञानाच्या म्हणजे अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले. गांधींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाद्वारे ‘भारतातील शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे आणि चारित्र्य निर्माण करण्यात प्रखर अन् अत्यंत प्रभावी असून संपूर्ण देशात सुलभपणे उपलब्ध असणारे होते’, असे सिद्ध केले आहे.त्यांनी १८२३ मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे, ‘(ज्यांना आपण वंचित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा अन् विद्यापिठे यांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता.’ 
       २. शिक्षण पद्धतीसुद्धा वैज्ञानिक होती. ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतींनुसार ‘माहितीची देवाण-घेवाण’ एवढ्यापुरतेच ज्ञान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार जे आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट घेतात आणि शिष्याचे संपूर्ण दायित्व ग्रहण करतात, ते म्हणजे गुरु. गुरु शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून त्याला मार्ग दाखवतात. इतकेच नव्हे, तर ते त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतातसुद्धा आणि आवश्यकता पडल्यास शिष्याचे बोट धरून त्याला कडेवरही उचलून घेतो. आजच्या विद्येच्या क्षेत्रात गुरु-शिष्य परंपरा लोप पावली आहे. हे जीवनात आलेली पोकळी आणि निराशा यांचे मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धत पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.’

आनंदायी गुरुकुल शिक्षणपद्धती भारतात आणण्यासाठी कटिबद्ध व्हा !गुरुकुल पद्धतीच आवश्यक

‘समाजात पैसा देऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी त्यानंतर नागरिक होऊन आपला व्यवसाय सचोटीने न करता, त्यातून अर्थार्जनाचाच विचार प्राधान्याने करून कार्य करतात. त्यांत त्यांना आत्मीयता रहात नाही, तर आपला अप्पलपोटेपणा साधून ‘आपण व आपले कुटुंब कसे ऐश्वर्यात, आरामात राहू शकेल’, हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश असतो. एखादा विद्यार्थी राजकारणात गेला, तर तेथेही समाजकल्याण बाजूला ठेवून भ्रष्टाचाराद्वारे संपत्ती जमा करतो.  त्यामुळे सामान्य जनताही होरपळून निघते.
     म्हणूनच पूर्वी ऋषीमुनींनी आपल्या आश्रमातून विद्यार्थ्यांना सर्व दृष्टीने सामर्थ्यवान करणारे शिक्षण दिले. त्यामुळे तो आश्रमातून १२ वर्षांनंतर बाहेर पडल्यानंतर आत्माविश्वासाने जीवनाला सामोरा जात असे. जीवन ही कला आहे. जीवन सर्वतोपरी स्वयंपूर्णरित्या आनंद, सामर्थ्य व स्वावलंबीत्व यांनी कसे जगावे, हे त्याला त्या आश्रमात सांगितले गेले होते, नव्हे त्याच्याकडून तसा पाठ आणि प्रयोग करून घेण्यात आला होता.’ 
गुरुकुल शिक्षणपद्धतच खर्‍या अर्थाने प्रत्येकव्यक्तीचा आणि देशाचा विकास घडवून आणेल
     भारतात पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुलपद्धतीने विद्यादान केले जात असे. ब्रिटिश राजवटीत भारतियांना इंग्रजाळलेले करण्याच्या हेतूने लॉर्ड मेकॉलेने बुद्धीपुरस्सर कुचकामी अशीच शिक्षणपद्धती त्या काळी अमलात आणली. स्वातंत्र्य मिळाल्यावरही तीच शिक्षणपद्धती अजूनही चालूच ठेवण्यात आली आहे. आजच्या शिक्षणामुळे काळ्या कातडीचे बाबू लोक फक्त तयार होत आहेत. पदवीधर झालेल्या तरुणांना त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात केवळ पाच टक्केच उपयोग होतो. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे व्यवसाय लगेचच करायला जमत नाही. त्यामुळे त्यांना अपयश येते व देशाच्या विकासावरही अनिष्ट परिणाम होतो. गुरुकुलपद्धतीने प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार व्यवसायाधिष्ठित शिक्षण प्रारंभापासूनच दिले गेले असते, तर तरुणांना व्यवसाय उत्तम प्रकारे करता येईल व देशाचा विकासही योग्यरीत्या होईल; म्हणून गुरुकुल शिक्षण पद्धतीचा नव्याने प्रारंभ केला पाहिजे.
पुनःश्च हरिॐ 
       ‘पाश्चिमात्यांच्या प्रभावाचा परिणाम लक्षात घेऊन पुन्हा गुरुकुले व ‘राष्ट्रीय शाळा’ स्थापन होत आहेत. त्यांनी पूर्वीची पद्धत आचरणात आणण्यास सुरुवात केली, तर जगात शांतता प्रस्थापित करून, समाजाला उन्नत बनवून, संपूर्ण सृष्टीला तिचे ऐश्वर्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य निर्माण करणारे खरे ज्ञानी तयार होतील, यात शंका नाही.’ 
     विज्ञान हे चैतन्यरहित असल्याने ते विद्यार्थ्यांना पाट्याटाकूपणा शिकवते. हे पाट्याटाकूपण कंटाळा आणणारे असते, म्हणून अशा अभ्यासाचा विद्यार्थ्यांना ताण येतो, तर अध्यात्म मात्र नित्यनूतन आणि चैतन्यमय असल्याने ते भक्तांना, भाविकांना दररोज निराळ्या पद्धतीचा आनंद देते, जसे वाचनात आपण खोल खोल जाऊ तसा आनंद द्विगुणीत होत असल्याचे समाधान आपल्याला लाभते, म्हणूनच ‘संत-चरित्र वाचतांना त्याचा खूप कंटाळा आला आहे, हे कधी एकदा वाचून संपते आहे, असे झाले आहे’, अशी वाक्ये कोणाच्याच तोंडून बाहेर पडतांना दिसत नाहीत, याचे कारण म्हणजे संत-चरित्रातील चैतन्य आणि त्यातील संतांचे अनुभूतींचे प्रत्यक्ष बोल ! पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदुधर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना आत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे.
      मग, चला तर परत एकवार ‘आनंददायी गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती’ भारतात आणण्यासाठी कटिबद्ध  होऊया आणि पुढील पिढ्यांना तरी चैतन्याचा आणि यातून मिळणार्‍या देवकृपेचा आनंद देण्यासाठी सज्ज होऊया !
    सनातन संस्थेने रामनाथी आश्रम, गोवा, येथे अशाच एका गुरुकुलाची २६ जुलै २०१० या दिवशी स्थापना केली आहे.’

गुरुकुल शिक्षणपद्धती

      आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत. गुरुकुल शिक्षणपद्धतीतच राम, कृष्ण घडले. त्यामुळे त्याची उपयोगिता अनन्यसाधारण अशीच आहे. 
१. दिनचर्या 
‘गुरुकुलातील दिनचर्येची शिस्त कडक असते. 
अ. पहाटे ५ वाजता प्रार्थना, मग गंगास्नान, सूर्योदयाला संध्यावंदन, गायत्रीमंत्राचा जप आणि त्यानंतर
सूर्यनमस्कार अथवा योगासने करायची.
आ. नंतर सकाळी ११.३० पर्यंत पाठ व्हायचा. 
इ. मग माधुकरी मागायची. ब्रह्मचर्यव्रताचा एक भाग म्हणून माधुकरी अपरिहार्य असते. 
ई. नंतर तासभर विश्रांती घेऊन सूर्यास्तापर्यंत पाठ चालतात. 
उ. सूर्यास्ताला दहा-पंधरा मिनिटे असतांना अध्ययन थांबवायचे.
ऊ. मग सायंसंध्या नंतर स्तोत्रपाठ अल्पसा फराळ घ्यायचा. 
ए. विश्रांती
२. अध्ययन-अध्यापन 
         नवीन पाठ सुरू झाला की, त्या नव्या पाठाचा मागच्या पाठाशी संबंध असे. पूर्वावलोकन व्हायचे. पाठ सुरू करण्यापूर्वी आचार्य दहा मिनिटे आदल्या दिवशीचा पाठ कितपत समजला, त्याची चाचणी घेत. नंतर नवा पाठ सुरू व्हायचा. विद्यार्थ्यांची तयारी होते कि नाही हे रोजच समजायचे. म्हणजे रोजच परीक्षा व्हायची. त्यामुळे परीक्षा कधी आहे, परीक्षेची तयारी कशी करायची, असे प्रश्नच नसत.
३. आर्थिक साहाय्य 
        आमच्या शिक्षणसंस्था कधीच शासनाच्या साहाय्यावर अवलंबून नव्हत्या आणि नाहीत. लोकच त्यांना धन देत आणि स्वतःला कृतार्थ मानीत. शासन कधीच शिक्षणव्यवस्था वा संस्थात ढवळाढवळ करीत नसे. आमच्या प्राचीन राजनीती व शासनप्रणालीचा हा दंडक होता. शिक्षण पूर्ण स्वतंत्र असे.
४. हल्लीची शिक्षणप्रणाली आणि हुशार मुलांना अल्प हुशार मुलांमुळे विषय हळूहळू शिकावे न लागणारी गुरुकुल पद्धत
         समजा तुमचा मुलगा असामान्य आहे, बुद्धीमान आहे. दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम तो ३ वर्षांत सहज पूर्ण करून प्रथम श्रेणीत वरच्या क्रमांकाने उतीर्ण होईल, अशी त्याची क्षमता आहे; पण हल्ली त्याला तसा वाव नाही. इतरांबरोबरच त्याला ११ वीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्याच्या जीवनातील ८ वर्षे फुकट जातात. प्रत्येक परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल; परंतु त्याच्या आयुष्यातील जोमाची ८ वर्षे फुकट जातात. 
         आमच्या गुरुकुल पद्धतीत तसे होत नाही. गुरुजींकडे विद्यार्थी संहिता शिकतात. एखादा मंद विद्यार्थी साधे पुरुषसूक्त कंठस्थ करायला महिना घेतो. दुसरा विद्यार्थी ८ दिवसांत ते सूक्त म्हणतो. गुरुजी त्याला पुढचे सौरसुक्त शिकवतात. नंतर तिसरे, चौथे शिकवतात. त्याच्या प्रगतीत अन्य विद्यार्थ्यांमुळे खंड पडत नाही. काही विद्यार्थी ३ वर्षांत संहिता म्हणतात. पुढे पद, क्रम, जटा, घन इत्यादी तयारी करतात. मंद विद्यार्थ्याला कदाचित ५-६ वर्षे लागतील. या पद्धतीमुळे कुणाचेच नुकसान होत नसे.’ 

प्राणार्पण करून ग्रंथरूपी राष्ट्रीय अस्मिता जपणारे भारतीय !

     सहाव्या शतकात चिनी प्रवासी हुसेन त्संग धर्मभूमी भारताचे दर्शन घेण्यासाठी गैबीचे वाळवंट पार करून भारतात आला. बौद्ध तीर्थक्षेत्री भ्रमण करत करत बिहारमधील नालंदा विश्वविद्यालयात येऊन त्यांनी भारतीय परंपरा, समाज आणि कला इत्यादींचे अध्ययन काही वर्षे केले.
       नालंदा विश्वविद्यालयातून निरोप घेतांना भेट म्हणून त्यांना ४०० दुर्मिळ ग्रंथ आणि १५० नयन मनोहर बुद्ध प्रतिमा मिळाल्या.
       स्वदेशी परततांना काही भारतीय विद्यार्थ्यांसह ते निघाले. सिंधू नदी पार करतांना त्यांनी भारतमातेला प्रणाम केला. ज्या नावेत ते आणि विद्यार्थी बसले होते. ती नाव महासागरात आल्यावर दोलायमान होऊ लागली. त्याच वेळी भयंकर वादळ चालू झाले. केव्हा नाव बुडेल, हे सांगणे कठीण झाले. पर्वतप्राय समुद्रलाटा उसळू लागल्या. नावाडी ओरडून सांगू लागले, ‘‘नाव हलकी करावी लागेल. ग्रंथ आणि मूर्ती पाण्यात फेकून द्या.’ नावाडी आता हे अनमोल ग्रंथ आणि मूर्ती सागराच्या लाटात फेकून देणार, असे दिसताच भारतीय संस्कृतीचे उपासक असलेले सर्व विद्यार्थी तत्क्षणी म्हणाले, ‘भारत भूमीची ही दुर्मिळ ज्ञान संपत्ती समुद्रात फेकून देणे, आम्ही कधीही सहन करणार नाही.’’
      हुसेन त्संग काही उत्तर देण्यापूर्वीच एका पाठोपाठ एक याप्रमाणे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या अथांग सागरामध्ये उड्या टाकून जलसमाधी घेतली. हे आत्मसमर्पणाचे दिव्य दृश्य ते विस्फारीत डोळ्याने बघत होते. त्यांच्या डोळ्यांतून वहाणार्‍या अश्रूंनी त्या समाधीस्थ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. असा होता आमच्या प्राचीन विद्यार्थ्यांचा संस्कृती रक्षणार्थ सर्वस्वाचा त्याग ! वेळ पडल्यास प्राणत्याग करण्याची अशी होती त्यांच्यातील भावना ! अशा अनेक अज्ञात हुताम्यांच्या समर्पणामुळेच आमची भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा राष्ट्रीय प्रवाह अखंड चालत राहिलेला आहे.’

मुलांनो , हे अभिमानास्पद वास्तव जाणा !

ब्रिटीशपूर्व काळातील भारत ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर असणे
      ‘भारतातले ब्रिटीशपूर्व काळातील शिक्षण हे उत्कर्ष होणारे होते. याविषयी युरोपियन प्रवासी व शासनकर्ते यांच्या निःसंदिग्ध साक्षी आहेत. रामस्वरूप यांनी त्यांच्या Education System during Pre-British Periodया प्रबंधात ही चर्चा केली आहे.’
    अ. ‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता. आशिया व युरोप मध्ये अग्रणी होता. त्या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्हते. याला प्रमाण म्हणजे मेगॉस्थेनिस (खिस्ताब्द पूर्व ३०२) हा भारतातला प्रवासी इथल्या शिक्षणाने विलक्षण प्रभावित झाला. मेगॉस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या दरबारी होता, तो भारतातील ज्ञान व शिक्षण यांची विलक्षण प्रशंसा करतो.
   आ. ब्रिगेडियर जनरल अलेक्झांडर वॉकर इ.स. १७८० ते १८१० पर्यंत हिंदुस्थानात नोकरीला होता. तो सांगतो, `हिंदूइतकी शिक्षणाची ज्वलंत जाण जगातल्या कुठल्याही लोकांना नाही.
   इ. सार्वत्रिक शिक्षणाची सर्व भारतभर सुव्यवस्था असल्याचे शिक्षणव्यवस्थेचे त्या काळचे युरोपियन निःसंदिग्ध वर्णन करतात.
   खिस्ताब्द १८२० मध्ये Abbe J. A. Dubois सांगतो, `असे गाव सापडणे कठीण आहे की, जिथे शाळा नव्हत्या. विद्यार्थ्यांच्या गरजा पुरवणारे, त्यांच्या योग्यतेला अनुकूल असे शिक्षण असे.’
इंग्रज भारतात येण्यापूर्वी त्यांच्या देशापेक्षा भारतात साक्षरता होती !
       ‘इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये ७ लक्ष ३२ सहस्त्र गुरुकुले होते. ९७ टक्के लोक सुशिक्षित होते. त्या वेळी शिक्षणक्रमात १८ विषय होते. त्यात आयुर्वेद, योग, आरोग्य, गणित, स्थापत्य अशा अनेक प्रकारच्या विषयांचा समावेश होता. 
भारतीय शिक्षणप्रणालीची ही शक्ती जाणा !
‘विद्यार्थ्यांनी व्रतस्थ असलेच पाहिजे. भारतीय शिक्षण- शास्त्रज्ञांचा तसा कटाक्ष आहे. आहार, केशभूषा, विहारादी बाबतीत कटाक्षाने व्रतस्थ असायलाच हवे. संयम सांभाळलाच पाहिजे. तसेच भारतीय अध्यापन संस्थाचे कठोर नियमच होते. तिथे मनमानी नव्हती. मनमानी असेल, तिथे विद्या असंभव व जिथे विद्या, तिथे मनमानी अशक्य !
भारताच्या महान संस्कृतीचे आचरण करणारे पाश्चात्त्य !
       पाश्चात्त्य समाज भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, अध्यात्म, श्री भगवद्गीता इत्यादी अनेक बाबींकडे जागतिक देणगी म्हणून पहातो. अलीकडेच युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने जागतिक अभ्यासक्रमात हिंदु धर्मातील तत्त्वे दर्शित करणारी काव्ये स्वीकारली आहेत. ही काव्ये विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी, तसेच युवापिढीतील कुसंस्कार, क्रौर्य व दुर्जनता नष्ट करण्यासाठी पूरक ठरतील, असे युनेस्कोने म्हटले आहे. अमेरिका व युरोपीय देशांतील शिक्षणव्यवस्थेत संस्कृत भाषा व रामकृष्णादी अवतारांच्या कथांचे धडे अंतर्भूत आहेत. अमेरिकेच्या विद्यापिठात भगवद्गीतेचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला आहे.
स्वामी रामतीर्थांसारखा असा दृढ आत्मविश्वास किती आधुनिकांत आहे ?
                ‘स्वामी रामतीर्थ अत्यंत बुद्धीमान विद्यार्थी होते. त्यांचा आवडीचा विषय होता गणित. शिकत असतांना त्यांचे नाव तीर्थराम होते. एकदा परीक्षेत १३ प्रश्न दिले होते आणि त्यातील केवळ ९ सोडवायचे होते. तीर्थरामाने १३ च्या १३ प्रश्नांची उत्तरे लिहून त्याखाली एक टीप लिहिली. ‘१३ ही उत्तरे अचूक आहेत. कोणतीही ९ तपासावीत.’ असा त्यांचा आत्मविश्वास दृढ होता.’

ब्रिटिशांनी मेकॉलेपूर्वी भारतीय शिक्षणप्रणाली ब्रिटनमध्ये राबवायचा प्रयत्न करणे

          ‘वर्गप्रमुख, पाटी आणि गटचर्चा या संकल्पनांना आधुनिक शिक्षणपद्धतीत खूप महत्त्व आहे, असे आपण बघतो; पण मुळात या संकल्पना आल्या कुठून ?
तर या संकल्पना भारतियांच्या आहेत. १६२३ मध्ये ‘पेट्रो डेला वाले’ हा एक प्रवासी भारतात आला. त्याने इथली शिक्षणव्यवस्था बघितली. त्याने केलेल्या नोंदींमधे या सर्व व्यवस्थांचे वर्णन आहे.
       इ.स. १८०० च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीचे डॉ. बेल आणि लँकेस्टर या दोघांनी ब्रिटनमध्ये वर्गप्रमुख, पाटी आणि गटचर्चा यांसारख्या शिक्षण संकल्पना राबवायचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये भांडण लागले की, श्रेय कुणाचे ? आणि मग त्या भांडणासंबंधीच्या चौकशीतून असे निष्पन्न झाले की, मुळात हे सगळे श्रेय भारतियांचे आहे. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीचे एक अधिकारी ब्रिगेडीअर जनरल अलेक्झांडर वॉकर यांनी लिहून ठेवले आहे, `मलबारमधील भारतीय ब्राह्मणांकडे पाहिलेल्या या पद्धती अवर्णनीय आहेत. 
             शिक्षण देण्याच्या या पद्धतींमुळे समाजातील अत्यंत खालच्या स्तरापर्यंत अत्यंत लाभदायी पद्धतीने शिक्षण पोहोचवले जाते आणि या गोष्टींचा विचार आम्ही करायला पाहिजे.’ म्हणजे शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्येही किती प्रगती होती आणि काय दृष्टीकोन बाळगला जात होता, ते पहा. सर्वत्र शाळा होत्या. श्रीरंगपट्टनम् या ठिकाणच्या नोंदी सांगतात, ‘सर्व वर्गांतील लोक त्या ठिकाणी शिकायला येत असत आणि त्या विषयांमध्ये नौकानयन, वैद्यकीय शास्त्र, कायदा, न्याय असे सगळे विषय असत. त्याच्यामधे प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असेही विभाजन असे. ज्याला ज्या ठिकाणी, ज्या विषयाचे आणि जितके शिक्षण घ्यायचे तशी व्यवस्था असे.’