या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना

संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना

👉संख्याचा चढता व उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते.

👉चढता क्रम : - दिलेल्या संख्यांची चढत्या क्रमाची मांडणी करताना क्रमाने लहान संख्येपासून मोठया संख्येपर्यंत केली जाते.

     उदा. - 7924, 9834, 3450, 2500  या संख्यांमधील सर्वात डावीकडे असणारे अंक अनुक्रमे 7, 9, 3, 2 हे आहेत यांपैकी 9 हा अंक सर्वांत मोठा असून 2 हा अंक सर्वांत लहान आहे.  म्हणून 9834 ही संख्या सर्वांत मोठी संख्या आहे आणि 2500 ही सर्वांत लहान संख्या आहे.

चढता क्रम -  2500, 3450, 7924, 9834

👉उतरता क्रम :- दिलेल्या संख्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करताना क्रमाने मोठया संख्येपासून लहान संख्येपर्यंत केली जाते.

उदा.  7924, 9834, 3450, 2500

उतरता क्रम - 9834, 7924, 3450, 2500

 सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास डावीकडून दुस-या अंकांची तुलना करावी व संख्यांचा लहान- मोठेपणा ठरवावा.

👉तुलना :-   संख्यांचा लहान-मेाठेपणा ठरविणे म्हणजे संख्यांची तुलना करणे होय.

तुलना करण्यासाठी   <,  >,  =   ही चिन्हे वापरतात.

👉चिन्हांचा अर्थ :-

1)  <   च्यापेक्षा मोठा  

2)  >   च्यापेक्षा लहान   

3)  =    समान

 

 

 


No comments:

Post a Comment