या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

गुणाकार


गुणाकार

👉 गुणाकार - एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणे.  या क्रियेला गुणाकार म्हणतात.

👉 गुणाकार या क्रियेमध्ये गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक असतात.

👉
   3425   – गुण्य  
  X   6   - गुणक  
 20550  - गुणाकार

👉 गुणाकाराचे नियम -

👉 कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्य येतो. 0 x 6

👉 गुण्य, गुणक व गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो.

👉 कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते.  उदा  57x1 =57

👉 कोणत्याही संख्येला 10, 100, 1000....... अशा म्हणजे एकावर शून्य असणा-या संख्यांनी गुणताना, गुणाकारत गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत

👉 दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो.  या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो, तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.

👉 दोन अंकांचा गुणाकार करताना , गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल,  हे समजणे काही वेळा जरूरी असते.   अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत,

👉नमुना प्रश्न

1)     1) 100 रू च्या नोटांच्या बंडलामध्ये काही नोटा आहेत.  त्यांची एकूण किंमत किती असणार नाही?

1)  1) 35000      2) 4900      3)  9400     4)  8540

 स्पष्टीकरण :   100 रू. च्या नोटांची एकूण रक्कम मोजताना नोटांची संख्या x  100 असे करावे लागेल.
एकूण रक्कमेच्या दशक एकक स्थानी 00  असे अंक येतील

उत्तर पर्याय क्र. :  4  हे अचूक उत्तर आहे

 2) एका रांगेत 215   या प्रमाणे 132   रांगामध्ये किती रोपे लावता येतील?

1)  28280      2) 28380   3)  28340    4 )  27380

 स्पष्टीकरण :  एका रांगेत लावलेल्या रोपांच्या संख्येवरून अनेक रांगांत लावलेली एकूण रोपटयांची संख्या काढायची आहे म्हणजे  215 132    यांचा गुणाकार केला. गुणाकार 28380 आला.  ( गुणाकार पटकन करता यावा म्हणून त्यातील संख्यांची फोड केली. 
215 x 132  =  132 (200+15) = 132 x 200 + 132 x 15 = 26400 + 1980 = 28380

पर्याय क्र. : 2    हे अचूक उत्तर आहे




No comments:

Post a Comment