या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

एका शब्दाचेअनेक अर्थ

 

शब्द

अनेक अर्थ

अभंग

भंगलेला, का व्यरचनेचा  एक  प्रकार

अनंत

परमेश्वर, अमर्याद

अंग

शरीर, बाजू, भाग

अंक

संख्या, मांडी

अंबर

आकाश, वस्त्र

अंतर

मन, लांबी, भेद, फरक

आस

इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

आनंद

सुखाची कल्पना, मुलाचे नाव

ओढा

आकर्षण, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ

उत्तर

प्रश्नाचे उत्तर (खुलासा), एका दिशेचे नाव

ऋण

वजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार

कर

हात, सरकारी सारा,किरण

कलम

रोपांचे कलम, लेखणी

कळ

वेदना, भांडणाचे कारण, गुप्त किल्लीबटन

कर्ण

महाभारतातील योद्धा, कान, त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू

काळ

वेळ, मृत्यू, यम

कांबळे

घोंगडी, एक आडनाव

किरण

उन्हाची तिरीप, व्यक्तीचे नाव

कीर्ती

प्रसिद्धी, मुलीचे नाव

कुबेर

इंद्रदेवाचा खजाना, खूप श्रीमंत व्यक्ती

गार 

थंड,बर्फाची गोटी

घट

झीज, मडके

घाट

डोंगरातला रस्ता, नदीच्या पायऱ्या

चक्र 

चाक,एक शस्त्र

चरण

पाय, ओळ

चूक 

दोष,लहान खिळा

चिमणी 

एक पक्षी,गिरणीचे धुराडे

चिरंजीव

मुलगा, दीर्घायुषी

चीज 

सार्थक, दुधापासून बनवलेला पदार्थ 

छंद

नाद, काव्यरचनेचा एक प्रकार

जलद

लवकर, ढग 

जना

लोकांना, स्त्रीचे नाव

जात

समाज, प्रकार 

जोडा

बूट, जोडपे

जीवन

आयुष्य, पाणी

तट 

कडा,किनारा,किल्ल्याची भिंत 

ताव 

तापविणे,कागद

तीर 

काठ,बाण 

दंड 

काठी,शिक्षा,बाहू

धनी  

श्रीमंत मनुष्य,मालक

धडा

पाठ,रिवाज

नग 

पर्वत,वस्तू

नाव 

नाव,होडी

नाद 

छंद,आवाज,आवड

पय 

पाणी,दूध 

पत्र 

पान,चिठ्ठी

पक्ष 

पंख,वादातील बाजू,पंधरवडा,राजकीय संघटना

परी

पंख असलेली काल्पनिक देवता 

पार

झाडाभोवतालचा ओटा, पलीकडे

पान

जेवणाचे ताट, वहीचे पान, झाडाचे पान 

पाल

सरपटणारा प्राणी, राहुटी 

पालक

आईवडील, पालनपोषण करणारे, एक पालेभाजी

पास 

परवाना,उत्तीर्ण 

पूर 

पाण्याचा लोंढा,नगर

प्रताप

पराक्रम, मुलाचे नाव 

प्रवीण

कुशल, मुलाचे नाव

भाव 

भक्ती,किंमत,भावना,दर

मान 

शरीराचा एक अवयव,प्रतिष्ठा

माया 

धन,ममता

माळ 

फुलांचा सर,ओसाड जागा

रस 

द्रवपदार्थ,गोडी

रक्षा

रक्षण,राख

वर 

आशीर्वाद,नवरा,वरची दिशा

वळण 

प्रवृत्ती,वाकडा रस्ता

वजन 

मान,भार

वचन 

भाषण,प्रतिज्ञा

वात 

ज्योत,वारा,विकार

वार 

दिवस,घाव

वाणी 

व्यापारी,उद्गार,बोलणे

सुमन 

फूल,पवित्र मन

हार 

पराभव,फुलांची माळ



No comments:

Post a Comment