या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न


1 ते 100  संख्यांवर आधारित प्रश्न


👉 1 ते 100  मध्ये, कोणता अंक किती वेळा येतो?  दिलेला अंक असणा-या/नसणा-या संख्या? अंक असणा-या/नसणा-या 2 अंकी संख्या किती? याप्रकारचे प्रश्न येतात. या साठी विद्यार्थ्यांनी खालील तक्ता अभ्यासावा. 
👇  

अंक

 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो?

अंक दोन अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो?

अंक असणा-या दोन अंकी संख्या किती?

0

11

9

9

1

21

19

18

2 ते 9

20

19

18

 👉 1 ते 100  पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता,

        1) त्यांतील एक अंकी एकूण संख्या 9 आहेत ( 1 ते 9 )

        2) दोन अंकी एकूण संख्या 90  आहेत  (  10 ते 99 )

        3)  त्यातील तीन अंकी एकूण संख्या 1 आहे  ( 100 )

👉 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत.

                ( 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 )

 एकक स्थानी  1 ते 9   यांपैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत

 👉 1 ते 100  या संख्यामध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणा-या 9 संख्या आहेत.  या सर्व संख्या 11 च्या पटीतील संख्या आहेत.  ( 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 )

 त्याचप्रमाणे 12 च्या पटीतील 8 संख्या व 13 च्या पटीतील 7 संख्या आहेत.

 1 ते 100  पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 सम संख्या व 50 विषम संख्या आहेत.

 10 ते  99  या दोन अंकी संख्यांपैकी 45 सम संख्या व 45 विषम संख्या आहेत.

1 ते 100  मध्ये, 25 मूळ संख्या आहेत. 

 1 ते 100  मधेजुळया मूळ संख्यांच्या आठ जोडया आहेत.

त्यापुढीलप्रमाणे 3 5 ,  5  7 ,  11 13 ,  17  19 ,  29 31 ,  41 43 ,  59 61 ,  71 73.

सोडविलेली उदाहरणे :-

(1) 1 ते 200 मध्ये दोनअंकी संख्या किती आहेत?

       (1) 199 (2) 90 (3) 100 (4) 190

स्पष्टीकरण : एकूण 90 दोनअंकी संख्या आहेत. तीनअंकी संख्या 900 आहेत.

(2) 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?

       (1) 194 (2) 291 (3) 198 (4) 293 (2017)

स्पष्टीकरण : - 1 ते 100 संख्यात सर्वांत मोठी मूळ संख्या 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या - 3 ; 97 x 3 = 291

(3) 51 ते 100 मध्ये 8 अंक किती वेळा येतो?

      (1) 15 (2) 16 (3) 17 (4) 18

स्पष्टीकरण- 58, 68, 78, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 98 मध्ये 8 हा अंक 15 वेळा येतो.

(4) दोनअंकी समसंख्या किती आहेत?

      (1) 50 (2) 45 (3) 90 (4) 40

स्पष्टीकरण- समसंख्या दोनअंकी 45 आहेत.

(5) 0 हा अंक नसणाऱ्या दोनअंकी संख्या किती आहेत?

      (1) 71 (2) 72 (3) 80 (4) 81

स्पष्टीकरण- दोनअंकी एकूण संख्या = 90 त्यापैकी
0 अंक असणाऱ्या संख्या = 9
0 अंक नसणाऱ्या संख्या = 90-9= 81

 


1 comment: