या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

११) सरल

(चाल -पाऊले चालती पंढरीची वाट)
पाऊले चालती सरलची वाट
सुखी शिक्षणाची दावूनिया वाट ।।धृ।।
सूरू झाली शाळा तेव्हा मेसेज आला
सरल माहीतीचा फर्मान निघाला
नेट सेटर गुरुजी घेऊनी आला
शाळेत रेंजचा पत्ताच न मिळाला
डोंगर कपारीत शोधतोय वाट ॥१॥
पाऊले चालती....
मोबाईल मध्ये टाकला नेटचा पॅक
कधी कधी मोबाईलचं व्हायचा हॅक
बायको म्हणायची सारं सोडून टाक
का रे मारतो सरलची हाक
डोक्यात शिजलाय खिचडीचा पाक
पोरं बघतात मास्तराची वाट॥२॥
पाऊले चालती.......
तीन प्रकारचा सरलचा डाटा
भरताना फिरतोय घड्याळाचा काटा
अपडेट केल्यावर येतो गोल गोल पाटा
नाही सापडत सरलच्या वाटा
पोर म्हणतात मला चहा तरी चाटा
अंघोळ करताना येतो सरलचा थाट॥३
पाऊले चालती......
माहीती भरताना जागतोय रात्र
अपडेट होतयं थोडफार मात्र
मुळ पेशाचं शिक्षकाचं हरवलं पात्र
कधी सूरु झालं अन् संपलयं सत्र
सरल सरल पाहूनी थकलयं नेत्र
आलीय बघा ती सरल ची लाट॥४॥
पाऊले चालती......
म्हणतात सारेजण भरल का सरल
सरल नाही सरळ कस ते भरल
अडचणीत केला फोन तर बॅलेन्स उडेल
मध्येच होतय सारखच फेल
डोक दाबुनीया डोक्याला लावतोय तेल
तरीही स्वतः चा भरतोय मेल
ककोणालाही वाटेल हो हे खरोखरच गेल
वेबसाईटची हा बघतोय वाट॥५॥
पाऊले चालती.......
हातात माऊस करतोय टिकटिक
म्हणे माहीती करु नका लिक
कस चालेल सारे काही ठिक
पप्पा भरूनी झालं का म्हणतेय लेक
जाऊया आपण आता खाऊया केक
निघता निघता झाला अंधार दाट॥६॥
पाऊले चालती........
स्कूल,स्टाफ,स्टुडंट डाटा
याला कीती पेजच्या वाटा
चूकल थोडतर म्हणे पासवर्ड टाका
उचलूनीया फोन मारतोय हाका
सरल माहीतीचा घेतलाय ठेका
लवकर लवकर माहिती भर की लेका
भरूनी वाकूनी गेलीया पाठ ॥७॥
पाऊले चालती.......
भरू दे बाबा रे एकदाच सरल
चालू हे वर्ष कस कधी सरल
शाळेतील मूल म्हणे गुरुजी झालं का सरल
शिकवावयास गुरू तूम्हां वेळ कधी मिळेल
वेळ आहे अजूनही थोडफार उरेल
अशीच चालायची सरलची वाट
होईल आता उद्याची पहाट॥८॥
पाऊले चालती.....
लिहिताना चूकलो तर क्षमा ही असावी
मनात कोणतीही द्वेषभावना नसावी
सार्‍यांनी मिळूनी शिक्षणाचीआस्थाही जपावी
लिहिताना चूकलो तर क्षमा ही असावी
पाऊले चालती ......
������जय सरल

(श्री भालशंकर शिवदास यांची कविता)