या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती

विनम्र अभिवादन
 राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज    जयंती


जन्म २ ऑक्टोबर १८६९  — मृत्यू ३० जानेवारी १९४८
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले,अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्त्ताधीशायांना वीरोध केला.पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर१८६९ मध्ये पोरबंदर येथे झाला त्यांनी ब्यरिष्टर पदवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यातच त्यांनी ऑफ्रिकेत वर्णभेदाचा अनुभव घेतला.गोऱ्या इंग्रजांनी कृष्णवर्णीयांना एवढ्या वाईट रीतीने वागवायचे कि जणू ते कोणी गुलामच होते. तेच त्यांनी ऑफ्रिकेत अनुभवले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्यांनी बसायचे हे गोऱ्यांनी ठरवायचे! गांधींनी याविरुद्ध अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग स्वीकारून विरोध व्यक्त केला. ऑफ्रीकेतून परततांना त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला होता.

गांधीजी भारतात आल्या नंतर त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संपर्क साधून भारतातील परिस्थिती समजावून घेतली. सर्वत्र प्रवास करून प्रत्यक्षात त्या परिस्थितीचा अनुभव घेतला.माणसाने माणसांना मानुसकिनेच वागवावे हेच सूत्र सर्वांना समजावणे आवश्यक असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. समाजातल्या उच्च-निच्च, धनवान- द्लीद्री, सुशिक्षित – असुशिक्षित, मालक- मजूर, स्त्री- पुरुष  अश्या भेदा मधली दुरी कमी करने हेच प्राथमिक काम प्रथम करण्याचे ठरविले. त्याच बरोबर इंग्रजांच्या
देशविघातक जुलमी धोरनांना विरोध करतांना अहिंसा,सत्याग्रह या साधनांचा वापर करण्याचा निश्चय केला.

भारताती तत्वज्ञान, जीवनपद्धती यांच्या वरील सखोल चिंतनाने त्यांचे जीवन भारावले गेले. आश्रम-जीवन, स्वावलंबन ,अन्न- वस्त्रे यांच्या गरजा कमी करणे, साधी राहणी, आत्मशुद्धी, मानवतावादी विचारसरणी अश्या अनेक बाबींवर ते विचार करीत राहिले. परावलंबनाने भारताची आर्थिक कुचंबना होत आहे, इंग्रज सरकार भारतीयांना विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडते आहे, या विषयी विचार केल्यावर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वत:सूतकताई, गरजे पुरती वस्त्रे , स्वालंबन, आश्रम-जीवन, यांचा स्वीकार करून ‘ बोले तैसा चाले ‘ हा आदर्श त्यांनी जनते समोर ठेवला. एक पंचा,एक उपरणे,साध्या चपला अशा त्यांच्या दर्शनामुळे जनतेला आदरणीय आदर्श नेता वाटू लागले राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे या विषयात लक्ष घालून त्यांनी स्पृश्य -अस्पृश्य, हिंदू- मुसलमान, या सर्वावर भारतीय तत्वांची भावना निर्माण करून ऐक्य साधले पाहिजे असा प्रचार केला. त्यांच्या भाषणांतून लीखांनातून आणि प्रार्थनासभांतून हीच शिकवण ते देत राहिले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ हि उपाधी दिली. तसेच त्यांना ‘ राष्ट्रपिता’ म्ह्नवूनही गौरविले. गांधीजींच्या कोनत्याहि आंदोलनात त्यामुळेच जनता त्यांच्या सोबत राहिली.

इंग्रजांनी केलेल्या जुलमी कायद्यांना विरोध करण्यात गांधीजी अह्र्भागी असत. १९१९ मद्ये रौलट कायद्या विरूद्धचे आंदोलन, चंपाअरण्यातील शेतकर्यावरील अन्याया विरुद्ध सत्याग्रह, अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी उपोषण, असहकारीतेची चळवळ,हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले  २१ दिवसांचे उपोषन, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध, १९३० ची दांडीयात्रा इ. उदाहरणे त्यांच्या कृतीची कल्पना देणारी आहेत. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. इंग्रजांनी पुढे केलेल्या स्वार्थी योजनांना गांधीजींनी प्रखर विरोध केला.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न,अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे,सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाने, आचरणाने, शिकवणुकीने,आनि प्रत्यक्ष कार्याने प्रभावित झालेली जनता स्वातंत्र्यॊत्सुक बनली. हि निश्चिती झाल्यावर गांधीजींनी इंग्रजांना १९४२ मध्ये ‘चले जाव’ असे ठणकावून सांगितले. या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली. गांधीजीसह अनेक थोर नेते सरकारने तुरुंगात पाठविले. पण जनतेने माघार घेतली नाही उलट हे आंदोलन तीव्र केले. ठिकठीकाणी धरपकड, लाठीमार, गोळीबार करून इंग्रजांनी हि चळवळ दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर इंग्रजांना १९४७ मध्ये भारत सोडून जावेच लागले. आणि भारत स्वतंत्र झाला. सत्याग्रही गांधीजींच्या विच्यारात केवळ माणुसकी, शब्द पाळणे, अहिंसात्मक लढा देणे, यांना महत्व होते. काहींना हे विचार पटत नव्हते. देश्याची फाळणी झाली ती अश्या गुळगुळीत धोरणांनीच; अशी समजूत असलेल्यांनीच गांधींच्या विचारांचा निषेध केला. आणि या वैच्यारिक संघर्षनातूंच महात्माजींची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. पण मृत्यू समयी त्यांच्या मुखातून ‘ हे राम ‘ हे उद्गार काढून त्यांनी हे जग सोडले.
 जन्म २ आक्टोबर १९०४ ~~~ मृत्यू ११ जानेवारी १९६६

भारत देशाला  ”जय जवान जय किसान” ( Jay jawan jay kisan )हा मंत्र देणार्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म२ आक्टोबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला.त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.

महात्मा गांधी ( Matma Gandhi  ) यांचा जन्म व शास्त्री जीचा चा जन्म एकाच तारखेला येतो.  त्यांचे विचारहि एकच होते.महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्री जींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले. त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा  त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राजे महाराजाच्या समोर केलेल्या भाषणात गांधी म्हणाले होते, ‘ भारतातील जनता दालीद्र्यात मरत असताना एवढे अलंकार चढवून राजे महाराजे येथे आलेत. त्यांनी अगोदर आपले जडजवाहीर विकून टाकावे व मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटावा.’ महाराजांच्या श्रीमंतीची घानाघात  करणारे शब्द ऐकून अनेक राजे भर सभेतून उठून गेले. पण सभा एकण्यासाठी आलेली  जनता गांधीजींच्या या भाषणाने टाळ्या वाजवून यथोचित सन्मान केला. हे दृश्य शास्त्रीजींनी पाहिले. व ते देश प्रेमाने प्रेरित झाले. त्यांचे मन अभ्यासात लागे ना तेव्हा त्यांनी शाळेला राम राम ठोकला व ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले. पण त्या नंतर ते पुन्हा शिक्षणाकडे वळले.
 त्यांना ज्ञान सम्पाद्नाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज  झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी  अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. ** १९२७ साली ललितादेवी यांचेशी त्यांचा विवाह झाला ( Married with lalitadevi ). त्यांचा संसार त्यांनी उत्तम रितीने केला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजीनचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्षता घेत. ते देशासाठी ठिकठीकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे दुसर्या देशापासून काय घेण्या सारखे हे  त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूजिंचा ( Neharuji ) अंत झाल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले. अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदाला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले.

शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले.
त्याने सारे जग स्तिमित झाले आहे.भारताची मान जगात उंचावली. ”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.
” असे म्हणावेसे वाटते ~~  ” या देशाच्या पोरुषाचा , तुज शोभतो लाल खरोखर , तुझ्या आगळ्या व्यक्तित्वाने , आम्हा दिधले नव संजीवन ”   
'माझे सत्याचे प्रयोग' बंदिवानांना ठरतेय 'संजीवनी'
समाजात आज सर्वत्र हिंसा, अत्याचार व असहिष्णूता वाढीस लागल्याचे चित्र आहे. खून, दरोडे, हाणामार्‍या, बॉम्बस्फोट अशा पार्श्‍वभूमीवर गांधीजींच्या मृत्यू पश्‍चात इतक्या वर्षांनी आजही त्यांचे विचार समाजासाठी किती सर्मपक आहे. याची प्रचिती येते. मनुष्य केवळ शांतता व सद्भावनेच्या मार्गानेच चांगले जीवन जगू शकतो, हे त्रिकाल सत्य गांधीजींनी सांगितले आहे. काही क्षणाच्या राग व संतापामुळे झालेल्या चुकीमुळे कारागृहात बंदिवानाचे जीवन जगत असलेल्या कैद्यांचे जीवन ही गांधीजींच्या 'सत्य व अहिंसा' या गुणांनी उजळून निघाले आहे.सत्य व अहिंसेचे प्रवर्तक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (दि.२) जयंती. अन्याय व अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी गांधीजींनी सत्य व अहिंसा ही दोन प्रभावी शस्त्रे लोकांना दिली. हिंसात्मक आंदोलने, जाळपोळ यापेक्षा सत्याग्रह हे चळवळीचे प्रभावी माध्यम आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले. मनुष्याने सत्य व अहिंसेची कास धरल्यास तो जुलूम, जबरदस्ती व अन्यायाचा सहजपणे प्रतिकार करू शकतो. याची शिकवण त्यांनी लोकांना दिली. अगदी दक्षिण आफ्रिकेतील वर्ण व वंश भेदविरोधी चळवळीपासून ते दांडी यात्रेपर्यंतच्या अनेक लढय़ात त्यांनी या धारदार शस्त्रांचा (सत्य, अहिंसा) यशस्वीपणे वापर केला. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील साडेसहा वर्ष देशासाठी तुरुंगात घातली. हा कालावधी त्यांनी त्यांच्यातील गुणांच्या अधिक विकास करण्यात घातला.

बॉम्बे सवरेदय मंडळातर्फे गेल्या दहा वर्षांपासून गांधी जयंती व इतर वेळी कैद्यांसाठी महाराष्ट्रातील विविध कारागृहांत गांधी शांती परीक्षा आयोजित केली जात असून, कैद्यांमध्ये सहिष्णूता, सत्य व अहिंसा हेगांधी शांती परीक्षेच्या माध्यमातून बदलतेय हजारो कैद्यांचे जीवन

टाईप करताना काही शब्द चुकले आहेत कृपया समजून घ्यावे