या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

शब्द समूहाबद्दल एक शब्द


शब्द समूहाबद्दल एक शब्द A word samuhabaddala word

अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा -   अष्टावधानी 

अरण्याचा राजा-   वनराज

अरण्याची शोभा-   वनश्री

अनेकांमधून निवडलेले-  निवडक

अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट - अनपेक्षित

अनेक केळ्यांचा समूह -   घड 

अनेक गुरांचा समूह -   कळप 

अनेक फळांचा समूह -   घोस

अनेक फुलांचा समूह -   गुच्छ

अनेक माणसांचा समूह -   जमाव

आपल्या लहरीप्रमाणे वागणारा- स्वच्छंदी

आग विझवणारे यंत्र-   अग्निशामक यंत्र

अंग चोरून काम करणारा -   अंगचोर

अस्वलाचा खेळ करणारा -  दरवेशी

ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक 

ईश्वर नाही असे मानणारा -  नास्तिक

उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह -  धबधबा  

एकत्र येतात ती जागा -  तिठा   

ऐकायला येत नाही असा -  बहिरा 

ऐकायला व बोलायला येत नाही असा - मूकबधीर 

कथा सांगणारा -  कथेकरी 

कथा ऐकणारे -   श्रोते

कथा ( गोष्ट ) लिहिणारा -  कथाकार, कथालेखक

कल्पना नसताना आलेले संकट - घाला

कर्तव्याकडे पाठ फिरवणार -  कर्तव्यपराडमुख

कसलीच इच्छा नसलेला - निरिच्छ

कविता करणारा/ रचणारा - कवी

कमी वेळ टिकणारा - अल्पजीवी, छणभंगुर

कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य

कपडे धुण्याचे काम करणारा - धोबी 

कपडे शिवण्याचे काम करणारा - शिंपी

कष्ट करून जगणारा - श्रमजीवी

कमी आयुष्य असणारा - अल्पायुषी

कर्तव्य तत्परतेने पार पडणारा - कर्तव्यदक्ष  

कापड विणणारा - विणकर 

कादंबरी लिहिणारा लेखक - कादंबरीकार 

कविता करणारी -  कवयित्री 

किल्ल्याच्या सभोवतालची भिंत -  तट

कुस्ती खेळण्याची जागा - हौद,आखाडा

केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा - स्वार्थी 

केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ 

केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न

कैदी ठेवण्याची जागा - तुरुंग  

कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल - क्रांती 

कोणावरही अवलंबून असलेला - स्वावलंबी

खूप दानधर्म करणारा - दानशूर 

खूप आयुष्य असणारा - दीर्घायुषी

खूप पाऊस पडणे -  अतिवृष्टी

खूप मोठा विस्तार असलेले-   ऐसपैस,विस्तीर्ण

गुरे राखणारा - गुराखी 

गाईसाठी काढून ठेवलेला घास - गोग्रास

गोलकार फिरणारा सोसाटयाचा वारा - वावटळ

घरदार नष्ट झाले आहे असा - निर्वासित 

घरापुढील मोकळी जागा - अंगण 

घरे बांधणारा - गवंडी 

घोडे बांधायची जागा - पागा, तबेला

चरित्र लिहिणारा - चरित्रकार

चार रस्ते एकत्र येतात ती जागा -  चौक

चांदण्या रात्रीचा पंधरवडा -  शुक्लपक्ष 

चित्रे काढणारा -  चित्रकार 

जमिनीखालील गुप्त मार्ग -  भुयार

जमिनीचे दान -  भूदान

जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणोर प्राणी -  उभयचर

जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर  

जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार 

जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे - आभास 

जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा -  दुकान

ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते -  अवर्णनीय

ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते -  अविस्मरणीय 

ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू 

ज्याला आईवडील नाहीत असा - अनाथ,पोरका

ज्याला मरण नाही असा - अमर

ज्याच्या हाता चक्र आहे असा - चक्रपाणी, चक्रधर

ज्याला लाज नाही असा - निर्लज्ज

ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा - वजर 

झाडांची निगा राखणारा - माळी

ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे - नियतकालिक

डोंगरकपारीत राहणारे प्राणी - गिरिजन

ढगांनी भरलेले - ढगाळलेले, अभ्राच्छादित

तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला - अतिथी 

तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण - तिठा

थोडयावर संतुष्ट असणारा - अल्पसंतुष्ट

दररोजचा ठरलेला कार्यक्रम - दिनक्रम

दगडावर कोरलेले लेख - शिलालेख 

दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार 

दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक 

दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक 

दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक 

दर महिन्याला प्रसिद्ध होणारे - मासिक 

दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक 

दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे -  षण्मासिक 

दर वर्षाला प्रसिद्ध होणारे - वार्षिक 

दारावरील पहारेकरी - द्वारपाल, दरवान 

दुष्काळात सापडलेले - दुष्काळग्रस्त 

दुस-यावर अवलंबून असणारा - परावलंबी 

दुस-यावर उपकार करणारा - परोपकारी

दुस-याला काहीही सहजगत्या देणारा - उदार,दिलदार

दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा - वृत्तनिवेदक  

देशाची सेवा करणारा - देशसेवक 

देवापुढे सतत जळणारा दिवा - नंदादीप 

दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण - संगम

धान्य साठवण्याची जागा - कोठार 

नदीची सुरवात होते ती जागा - उगम

नदीतील खोलगट भागातील खोल पाणी - डोह

नाटके लिहिणारा - नाटककार

नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा - अभिनेता 

नेहमी घरात बसून राहणारा - घरकोंबडा 

पहाटेपूर्वीची वेळ - उष:काल

पाहण्यासाठी आलेले लोक - प्रेक्षक

पाण्याखालून चालणारी बोट - पाणबुडी

पाण्यात राहणारे प्राणी - जलचर

पाऊस अजिबात न पडणे - अवर्षण 

पायात चपला वा बूट न घालता चालणारा - अनवाणी

पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक

पालन करणारा - पालक

पायी चालणारा - पादचारी

पुरामुळे नुकसान झालेला - पूरग्रस्त

पूर्वी कधी घडले नाही असे - अभूतपूर्व, अपूर्व  

प्रेरणा देणारा - प्रेरक

फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण - सदावर्त, अन्नछत्र 

बसगाड्या थांबण्याची जागा - बसस्थानक 

बातमी आणून देणारा/देणारी - वार्ताहर 

बोलता येत नाही असा - मुका

भाषण ऐकणारा - श्रोता

भाषण करणारा - वक्ता  

मन/चित्त आकर्षित करणारा - मनोहर, चित्ताकर्षक, मनोवेधक, चित्तवेधक

मालाचा साठा करून ठेवण्याची जागा - गुदाम,कोठार,वखार

मासे पकडणारा - कोळी

माकडाचा खेळ करणारा - मदारी 

मातीची भांडी करणारा - कुंभार 

मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय 

मूर्ती बनवणारा - मूर्तिकार

मूर्तीची पूजा करणारा - मूर्तिपुजक

मूर्तीची तोडफोड करणारा - मूर्तिभंजक

मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय

मोजता येणार नाही असे - अगणित,असंख्य

योजना आखणारा - योजक

रक्षण करणारा - रक्षक

रात्रीचा पहारेकरी - जागल्या

राज्यातील लोक - प्रजाजन,रयत,प्रजा

रणांगणावर आलेले मरण - वीरमरण 

रोग्यांची शुश्रुषा करणारी - परिचारिका 

लग्नासाठी जमलेले लोक - वर्हाडी 

लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत - आबालवृद्ध 

लढण्याची विदया - युध्दकला

लाखो रूपयांचा धनी - लक्षाधीश

लाकूडकाम दरणारा - सुतार

लाज नाही असा - निर्लज्ज 

लागत नाही असा - अथांग 

लिहिता-वाचता येणारा - साक्षर

लिहिता-वाचता न येणारा - निरक्षर

लोकांचा आवडता  - लोकप्रिय

लोकांनी मान्यता दिलेला - लोकमान्य्‍ा

लोकांचे नेतृत्व करणारा - लोकनायक

वनात राहणारे प्राणी - वनचर

वाद्य वाजवणारा - वादक

वाडवडिलांनी मिळवलेली - वडिलोपार्जित 

विनामुल्य पाणी मिळण्याची जागा - पाणपोई 

विमान चालवणारा - वैमानिक 

व्याख्यान देणारा - व्याख्याता 

शत्रूकडील बातमी काढणारा - हेर 

शत्रूला सामील झालेला - फितूर 

शिकारीसाठी उंच बांधलेला माळा - मचाण

शेती करणारा - शेतकरी

शोध लावणारा - संशोधक 

श्रमांवर जगणारा - श्रमजीवी 

सतत काम करणारा - दिर्घोद्योगी 

सतत निंदानालस्ती करणारा - निंदक

समाजाची सेवा करणारा - समाजसेवक

सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष - कल्पवृक्ष 

सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय - कामधेनू 

सिनेमाच्या कथा लिहिणारा - पटकथालेखक

सुखाच्या मागे लागलेला - सुखलेालुप

स्तुती गाणारा - भाट 

सूर्य उगवण्याची घटना - सूर्योदय 

सूर्य मावळण्याची घटना - सूर्यास्त 

सोन्याचांदीचे दागिने करणारा - सोनार

स्वर्गातील इंद्राची बाग - नंदनवन 

स्वतः श्रम न करता खाणारा - ऐतखाऊ 

स्वतःचा स्वार्थ न पाहणारा - निःस्वार्थी

स्वत:ची बुध्दी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा - सांगकाम्या

स्वत: संपादन केलेली - स्वार्जित,स्वसंपादित

स्वत:च्याच फायदयाचा विचार करणारा - स्वार्थी

स्वत:बददल अभिमान असलेला - स्वाभिमानी

स्वत:बददल अभिमान नसलेला - स्वाभिमानशून्य

स्वदेशाचा अभिमान असणारा - स्वदेशाभिमानी

संकटे दूर करणारा - विघ्नहर्ता 

हरिणासारखे डोळे असणारी - मृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना,कुरंगनयना

हत्तीला काबूत ठेवणारा - माहूत  

हाताच्या बोटात घालायचं दागिना - अंगठी 

हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा -   नावाडी

हिंडून करायचा पहारा- गस्त

होडी चालवणारा - नावाडी, नाखवा,नाविक