या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

राहुनच गेलं...

महिला दिनानिमीत्त एक हलकी फुलकी कविता

हे बघायला आले त्यावेळी
रूबाब यांचा तो बघतच बसले...
आल्या प्रश्नाला धडाधड उत्तर दिली....
लाजायचं कसं ते
राहूनच गेलं !

हनीमुनच्या पहिल्या रात्री
हे म्हणाले
तू खूप सुंदर दिसतेस
लाज-लाजून "इश्श" म्हणायचं
कसं ते राहूनच गेलं !

यांना प्रमोशन मिळालं
ते घरी पेढे घेऊन आले
कसं सुचलं नाही कुणास ठाऊक...
तेव्हा आनंदाने कडकडून
मिठी मारायची यांना
ते राहुनच गेलं !

"मुलगा मुलगी" मोठी झाली
सून उच्चशिक्षीत अन सद्गुणी मिळेल
पण मुलाच्या लग्नात
वरमाईचा तोरा मिरविण्याचं
ते राहुनच जाईलं !

संसाराचा गाडा हाकता हाकता
देवाकडे जरा दुर्लक्ष झाल
व्रतवैकल्य, कर्मकांड आणि
जपजाप्य इत्यादि इत्यादि....
ते करायचं राहुनच गेलं !

परवा देवच माझ्या स्वप्नात आला,
म्हणाला तू कर्तव्यदक्षपणे
संसार केलास,
सगळ्यांचं सगळ नीट केलंस
तुझ्यात उपासनेची खोट काढून,
तुला शिक्षा देण्याचं माझसुध्दा,
आपोआप राहुनच गेलं !!

महिला दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 

No comments:

Post a Comment