या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

शिवाजी महाराज


छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

जन्म
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

शिवाजी जयंती
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन कॅलेंडरप्रमाणे व्यवहार होऊ लागले.

ग्रेगेरिअन कॅलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, गांधी, डॉ. आंबेडकर, टिळक या सार्‍यांचा जन्म भारतात इंग्रजी कॅलेंडर लागू झाल्यावर झाला होता . त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते . गांधीच्या, टिळकांच्या किंवा अगदी बाळ ठाकरेंच्या जन्म दाखल्यावर इंग्रजी तारीख असल्याने त्यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार साजरी होते.

तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या सार्‍यांचा जन्म भारतात इंग्रजी कॅलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.

आज ज्या ग्रेगेरिअन कॅलेंडरने शिवाजीच्या जन्माची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर अधिकृत होते. ज्युूलिअन कालगणना व ग्रेगेरिअन कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. कोणती कालगणना शिवाजीच्या जन्मावेळी प्रचलित होती त्यानुसारमुळे शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी व्हावी असे काही जणांना वाटते. सरकरला असे करणे अडचणीचे आहे म्हणून सरकारी जयंती तारखेनुसार असते.

शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरियन कॅलेंडर असते तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. पहा : शिवाजीच्या जन्मतारखेचा वाद


शहाजीराजे
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई
जिजाबाई व बाल शिवाजी

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.

मार्गदर्शक

लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.

जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण,भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.
मावळ प्रांत

छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.

अनुक्रमणिका 

No comments:

Post a Comment