या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

माय माझी आई


��माय माझी माऊली
दिली तूच सावली
तूच मला म्हणाली 
ठेवील तुझी खुशाली

��गरीब होती परिस्थिती
केल्या तू किती कसरती
उठून कधी राती
दळली तू जाती

��मोल मजुरी करूनी
खळगी आमची भरायची
धुणीभांडी धुवूनी
शिक्षण आमचं करायची

��झालाच अम्हांस उशीर
तर कंदील घेऊन धावायची
शोधत शोधत शिवार
धुंडून तू काढायची

��जपलं तू फूलांसारख
वाढवलं अम्हांस पाखरा सारखं
भरारीचं बळ दिलं
जीवनाचं चीज केलं

��व्हायचो आम्ही भयभयीत
तेव्हा तू घ्यायची कुशीत
बोलत बोलत खुशीत
डोळे आमची पुसीत
��कुठे कापड जर फाटले
तर तू ठिगळ लावून झाकले
अम्हांला कधी एकटे नाही टाकले
तुझ्या आशीर्वादाने जीवन हे लाभले.
��माय तूच आमची देवता
घडविले भाग्य तू आता
तूच आमची जन्मदाता
तूच आमची भाग्यविधाता
अशी तू आमची माता
तुझ्या साठी सारे आयुष्य आता...

��रचना श्री. भालशंकर सर
जि.प.शाळा मोगरवाडी.केंद्र - वरदाडे.