या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१२) माझी लेक

अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटीं येते
नाव सुद्धा माझं ती
इथेच ठेऊन जाते।।

पहिला घास, देवा, ती
माझ्या कडून खाते
माझाच हात धरुन ती
पहिलं पाऊल टाकते।।

माझ्याकडूनच ती
पहिलं अक्षर शिकते
तिच्यासाठी सुद्धा मी
रात्र रात्र जागते।।

कुशीत माझ्या झोपण्यासाठी
ती गाल फुगवुन बसते
मी आणलेला फ्रॉक घालून
घर भर नाचते।।

अशी कशी लेक, देवा,
माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे हे
तिचे माझे नाते।।

एक दिवस अचानक, ती,
मोठी होऊन जाते
आई, तू दमलीस का, गं?
हळूच मला विचरते।।

माझ्या साठी कपडे, चप्पल,
खाऊ घेऊन येते
नव्या जगातील नविन गोष्टी
मलाच ती शिकवते।।

तिच्या दूर जाण्याने
कातर मी होते
हळूच हसून मला ती
कुशीत घेऊन बसते।।

कळत नाही मला, देवा,
असे कसे होते
कधी जागा बदलून ती
माझीच आई होते।।

          देव म्हणाला, ऐक, पोरी
          तुझे, तिचे नाते
          विश्वाच्या ह्या साखळीची
          एक कडी असते।।

तुझ्या दारी फुलण्यासाठी
हे रोप दिले असते
सावली आणि सुगंधाशी तर
तुझेच नाते असते।।

वाहत्या प्रवाहाला, कोणी,
मुठीत कधी, का, धरते ?
मार्ग आहे ज्याचा, त्याचा
पुढेच असते जायचे।।

तुझ्या अंगणातली धारा ही
"जीवनदात्री" होते
आणि वाहती राहण्यासाठीच
"गंगा" ''सागराला" मिळते।
एक तरी मुलगी असावी
उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना
न्याहाळायला मिळावी ॥१॥

एक तरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
नाना मागन्या पुरवताना
तारांबळ माझी उडावी॥२॥

एक तरी मुलगी असावी
मैचींग करताना बघावी
नटता नटता आईला तिने
नात्यातली गंमत शिकवावी॥३॥

एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपितं तिनले
हळूच कानात सांगावी ॥४॥

एक तरी मुलगी असावी
गालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात
गळामिठी घालावी ॥५॥

एक तरी मुलगी असावी
निदान सुनेच्या रुपात मिळावी
लेकीची कसर तिने
थोडीतरी भरून काढावी ॥६॥