या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

प्रश्नावली दि. 08/10/2015

१) तवांग मुद्दय़ांसंबंधीचे भारतातील राज्य कोणते? 

२) काही वर्षांपूर्वी चर्चेत असलेला 'वूलर बॅरेज' कोणत्या नदीवरील आहे?

३) भारताची कैगा अणुभट्टी कोणत्या राज्यात आहे?

४) 'कोसी करारा'शी संबंधित देश कोणते?

५) भारताने बांधलेले 'फराक्का 'बॅरेज' कोणत्या नदीवरील आहे?

६) अमृतसर(अमृत तलाव)ची स्थापना कोणत्या शीख धर्मगुरूने केली?

७) भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे, असा विचार प्रथम कोणी मांडला?

८) भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्‍चिम विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

९) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

१0) नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे?

११) भारतीय रेल्वेतील ब्रॉडगेज(दोन रुळातील अंतर)ची लांबी किती आहे?


उत्तर :- १) अरुणाचल प्रदेश, २) झेलम, ३) कर्नाटक, ४) भारत-नेपाळ, ५) गंगा, ६) गुरू रामदास, ७) लॉर्ड रिपन, ८) हुबळी, ९) गोवा, १0) उत्तर प्रदेश, ११) १,६७६ मि. मी.