या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

बोधकथा दि. 07/10/2015

परिवर्तन 
एका गावातील एक व्यापारी कुटुंब खूप श्रीमंत होते. गावात त्या कुटुंबाला मान होता. प्रतिष्ठा होती. परंतु चक्र बदलले. त्या कुटुंबाला व्यापारात तोटा आला. संपत्ती संपली. गरिबी आली. कुटुंबप्रमुखांनी तर अंथरुणच धरले. हातपायच गाळले. ते भयभीत झाले. हादरले. व्यापारातील तोटा ते सहन करू शकले नाहीत.
हृदयाच्या तीव्र झटक्याने अकालीच त्यांचे निधन झाले. सारे कुटुंबिय दिड्मूढ झाले. कुणालाही काही सूचत नव्हते. काय करावे समजत नव्हते. जी काही संपत्ती राहिली होती. तीसुद्धा हळूहळू संपत होती.
कुटुंबातील सारेच लोक चिंतेत होते. त्यांच्यापैकी एकाच्या वाचनात एक विचार आला, 'गरिबी हे एक मानसिक दुबळेपण आहे.' विचार, लेख तर अनेक प्रसिद्ध होतात. पण ते प्रतीत होणे महत्त्वाचे असते. परंतु या कुटुंबासाठी त्या विचाराने फार मोठे कार्य केले. समुद्रात भरटकलेल्या जहाजाला दीपस्तंभ ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतो. त्याप्रमाणे त्या विचाराने त्या कुटुंबाला मार्गदर्शन केले.
सर्व कुटुंबियांनी निश्‍चय केला. आपली परिस्थिती पालटण्याचा निर्धार केला. बघता बघता काही वर्षातच त्यांच्या आर्थिक स्थितीत क्रांतिकारक परिवर्तन घडून आले. सर्व कुटुंबियांनी आपली मने गतिमान ठेवली. सर्वजण कृतिशील राहिले. भ्रमांची पर्वा केली नाही. सर्वांचा ध्यास एकच होता आणि तो म्हणजे पूर्वीची स्थिती प्राप्त करावयाची असा ध्यास. कष्ट आणि प्रयत्नच उर्जितावस्तेकडे नेणारे ठरले. ते कुटुंब पुन्हा सुखी, संपन्न व आंदी बनले.

तात्पर्य : गरिबीवर मात करता येते. चिकाटी व जिद्द हवी.

No comments:

Post a Comment