जीवनातील वेली वरती शिक्षक मी झालो
या देशाचे आधारस्तंभ घडवीत चाललो ।। धृ ।।
विद्यामंदिरि सदैव त्यांच्या ,पुजारी मी असे
जिवंत पुतळे पवित्रतेचे ,दृष्टीस माझ्या दिसे
निर्मळ मन पाहून तयांचे आनंद फुललो ।। 1 ।।।
छोटे छोटे बालक माझे ,लुकलुकनारे तारे
संस्काराने ह्रदयी सुंदर ,फूलवुनिया पिसारे। २१)
विविध रंगामधुनि एकता निभावित चाललो ।। 2 ।।
सत्कार्याने फूललो अंकुर ,विकसनशील राष्ट्राचे।
देशभक्तिमधुनि घडेल, चारित्र्य गुणवान बलकांचे।
कोवळ्या कळया फुलविताना रममाण मी जाहलो।।3।।
(सिंगारपुतळे विजय रावसाहेब वि मं गुडेवाडी ता.चंदगड )
No comments:
Post a Comment