या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३०) पिंगळा आणि कावळा

पिंगळा नावाचा पक्षी भूतभविष्य जाणतो असे म्हणतात. त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बयावाईट कल्पना लोकांनी ठरविल्या आहेत.एकदा एका कावळ्याने त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत निघाला. तो आवाज ऐकून खालून चालणाच्या माणसांनी आश्वर्याने वर पाहिले व तो ढोंगी कावळा दिसताच त्याच्याकडे उपहासाने पाहात ते चालते झाले.
तात्पर्य- नुसत्या पोशाखाने आणि हावभावांनी माणसाला पात्रता येत नाही. ती उपजतच असावी लागते.