या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

५४) निराश झालेले कोळी

एकदा काही कोळी नदीत जाळे टाकून मासे धरीत मासे त्यांना मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा जाळे टाकले व ते वर उचलतांना इतके जड लागले पण जाळे वर ओढून पहातात तो त्यात एक मोठा दगड व अगदी थोडे बारीक मासे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना फार वाईट वाटले; तेव्हा एक कोळी म्हणाला, मित्रांनो, सुख आणि दू:ख ही जुळी भावंड आहेत. 
तात्पर्य - सुखदुःखं मनुष्यमात्राच्या मागं लागलीच आहेत. त्यापैकी एक आले की त्याच्यामागून दुसरे आलेच म्हणून समजावे.