या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३)आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा !

         भारतीय परंपरेनुसार तिन्हीसांजेला दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडतांना, प्रवासाहून घरी परतल्यानंतर, नवीन कपडे परिधान केल्यावर, अशा विविध प्रसंगी घरातील मोठ्यांना पाया पडण्याची पद्धत आहे. एकप्रकारे ही आशीर्वाद घेण्याचीच पद्धत आहे. मुलांनो, पुढील लेख वाचून नमस्कार करण्याच्या कृतीमागील शास्त्र जाणून घ्या आणि त्यानुसार आचरण करून सुखी व्हा !

         आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा. 
        काही मुलांना आई-वडिलांना वाकून नमस्कार करायची लाज वाटते. मुलांसाठी आई दिवसभरात १० वेळा तरी खाली वाकते. बाहेर खेळतांना मुलांकडून शेजार्‍याची काही हानी (नुकसान) झाली, तर शेजार्‍याने केलेला अपमान वडील सहन करतात. अशा आई-वडिलांना वाकून नमस्कार करण्याची का लाज वाटावी ? मुलांनो, आजपासून करणार ना सर्व जण आई-वडिलांना वाकून नमस्कार ?
        केवळ आई-वडिलांनाच नाही, तर ताई-दादासह घरातील सर्व मोठ्या मंडळींनाही वाकून नमस्कार करावा. मुलांनो, जिथे जिथे मोठेपण असेल, मग ते वय, ज्ञान, कला असे कशातही असो, तिथे तिथे तुमचे मस्तक झुकले पाहिजे.
मोठ्यांना वाकून नमस्कार का करावा ?
        मोठ्यांना वाकून नमस्कार केल्याने त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त होतो, तसेच आपल्या अंगी नम्रता येते. ‘वाकून नमस्कार करणे’, ही गर्व (अहंकार) अल्प (कमी) करण्याचीही सोपी युक्ती आहे.
        ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे रहाती’ असे एक वचन आहे. अहंकाराने माणसाचा नाश होतो; मात्र अंगी नम्रता असलेला नेहमीच टिकून रहातो.