या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४४) साप आणि खेकडा

एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकडयाने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती  
तात्पर्य -राजमार्ग सोडून वाकडया मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.