या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४६) ससे, कोल्हे आणि गरुड

कदा ससे आणि गरुड यांच्यात भयंकर लढाई चालू होती. तेव्हा गरुडांचा पाडाव करण्याच्या कामी कोल्ह्याची मदत घेण्याचे सशांनी ठरविले. तशी त्यांनी कोल्ह्यांना विनंती केली. सशांचे सामथ्र्य किती आहे त्याचा विचार न करता ते मूर्ख कोल्हेही मदत करण्यास तयार झाले. थोडयाच वेळात गरुडांनी सशांबरोबरच कोल्ह्यांचाही पराभव केला. 
तात्पर्य- भांडणाच्या दोन पक्षांचे बल पाहिल्याशिवाय त्यांच्या भांडणात कधी पडू नये.