या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४) पणती वंशाची

वंशाचा दिवा हवा म्हणुन
का विझवता पणती वंशाची
का नाही देत तिला
एक संधी जगण्याची ॥१॥
दिवस सरला रात्र सरली
सोडा जुने विचार
वंशाच्या तेजस्वी पणतीचा
करा ना स्विकार ॥२॥
ती ‘कल्पना’ ती ‘सुनिता’
अवकाश कवटाळले त्यांनी
झाशीच्या या रणरागिणीची
तलवार तळपली रणी ॥३॥
जोतिबा अन्‌ सावित्रीनी
केला स्त्रिचा उद्धार
जिजामातेने दिधला आपणास
शिवबा सम रणवीर ॥४॥
आई, आजी अन्‌ बहिण
तीच आहे जीवनसखी
तीच सीता ती द्रौपदी
नाही कोण तिच्यासारखी॥५॥


आहे ती स्वर्गातील देवता
का करता मग तिची हत्या
का नाही देत तीला
एक संधी जगण्याची ॥६॥