या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

५२) घोडा आणि रानडुक्कर

एक तहानलेला घोडा एका ओढ्यावर पाणी पिण्यास गेला असताना एक रानडुक्कर पाण्यात डुबत असलेला त्याने पाहिला. तो रानडुक्कर घोडयाला पाणी पिऊं देईना, तेव्हा घोडा चिडला व दोघे भांडू लागले. तेव्हा घोडयाने एका माणसास, रानडुकराला ठार करण्याची विनंती केली. त्या माणसाने हातात शस्त्रे घेतली आणि घोड्यावर बसून तो निघाला. ओढ्याजवळ येताच त्याने रानडुकराला बाण मारून ठार केले. ते पाहून घोडयास खूप आनंद झाला. परंतु, त्या माणसाने त्यास सोडले नाही. तो म्हणाला, 'मला तुझा खूपच चांगला उपयोग होईल. तेव्हा मी तुला माझ्या तबेल्यात बांधणार हे ऐकताच एका साध्या गोष्टीसाठी आपण आपले स्वातंत्र्य कायमचे गमावल्या बदल घोड्याला वाईट वाटले.
तात्पर्य-दुसऱ्याचा पाडावा करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो तेव्हा आपण कायमचेच गुलाम होतो.