या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२) माणसं...

जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात
ती असतात... माणसं!
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात,
तीही असतात... माणसं!
वेड लावतात,
वेडंही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
तीही असतात... माणसं!
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात,
वाट लावतात
तीही असतात... माणसं!
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
तीही असतात... माणसं!
दूर रहातात,
तरीही जवळची वाटतात,
जवळ राहून देखील
परक्यासारखी वाटतात
तीही असतात... माणसं!!!..