या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१५) ग्रामीण कविता

काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।

कशी ऊन्हात , ऊन्हात तळतात माणसं ।
कशी मातीत , मातीत मळतात माणसं ।
कशी खातात जिवाला खस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।1।।

काळ्या बापाचं , बापाचं हिरवं रानं ।
काळ्या माईनं , माईनं पिकवलं सोनं ।
पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता ।।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।2।।

ईथं डब्यात तुला साखर लागतीया गोड ।
तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड ।
पण भाव ठरतो त्याला न पुसता ।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।3।।

जवा दुष्काळ , दुष्काळ घिरट्या घाली ।
तवा गावाला , गावाला कुणी न वाली ।
कसं सुगीत घालतात गस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।4।।

या भुमिचा , भुमिचा मुळाधिकारी ।
बाप झालाय , झालाय आज भिकारी ।
गाव असुन झालाय फिरस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।5।।

काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।।।।

1 comment:

  1. ग्रामीण भागाचे दर्शन या कवितेतून झाले. thank sir very well.

    ReplyDelete