या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३९) सिंह आणि हत्ती

एकदा एका सिंहाच्या मनात आले की, आपण एवढे पराक्रमी व शक्तिमान असून एका यःकश्चित् कोंबडयाच्या आवाजाला घाबरती ही आपल्याला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. आपण असे करता कामा नये. असा विचार करीत असतानाच एक मोठा हत्ती कान हालवत त्याच्यापाशी आला. त्याच्या चेहेच्यावरून ती दु:खी दिसत होता. तेव्हा सिंहाने त्याला विचारले, मित्रा तू इतका व्याकूळ का दिसतोस ? त्यावर हत्तीने उत्तर दिले, 'अरे, हे दुष्ट चिलट मला मघापासून दंश करतं आहे. त्याने मी त्रासून गेलो आहे.हे ऐकून् सगळ्यांनाच कुाही ना काहीतरी दुःख लागलेलेच आहे असे सिंहाच्या लक्षात आले.
तात्पर्य - 'जगी सर्व सुखी असा कोण आहे ?