या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३७) उंदीर आणि बेडूक

बेडूक उंदराच्या घरी जाऊन वारंवार पाहुणचार घेत असे. त्याने उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. परंतु वाटेत पाणी असल्याने मी येऊ शकत नाही, असे सांगून उंदीर ते टाळीत असे. परंतु एकदा बेडकाने खूपच आग्रह केला व त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून निघाले. बुडवून टाकले म्हणजे त्याच्या बिळातले सर्व अन्न आपल्याला मिळू शकेल म्हणून त्याने पाण्याच्या तळाशी बुडी मारली. तेव्हा उंदीर जोरजोरात ओरडून धडपड करू लागला. त्याचा आवाज ऐकून, आकाशातली एक घार खाली आली आणि उंदराला पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला. घारीने उंदराबरोबर त्यालाही खाऊन टाकले.
तात्पर्य- विश्वासघात करणाच्याला माणसाला प्रायश्चित्त हे मिळतेच.