या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४२) शिंपले

एकदा आतले मांस काढून घेतलेला एक मोठा शिंपला समुद्रकिनाच्यावर पडला होता. तो सूर्यप्रकाशात चकाकत होता. तो शिंपला पाहून एक लहान शिंपला तेजस्वी नि सुंदर आहे, पाहिलास का ? सौंदर्यात व चकचकीतपणात याची बरोबरी समुद्रात दुसरा कोणीही करू शकणार नाही. आई, मी याच्याइतका मोठा होऊन याच्यासारखं दिसायला अजून किती वर्ष लागतील कोण जाणे !' इतकी वर्ष वाट पाहता पाहता मी अगदी कंटाळून जाईन. त्यावर त्याची आई म्हणाली, 'अरे वेडया पोरा ! ह्या शिंपल्याची अशी स्थिती होण्यास त्याचं सौंदर्यच कारण झालं आहे, हे लक्षात आहे ना ? तू जर ह्याच्यासारखा लठ्ठ होऊन चकाकू लागशील तर तुझं मांस खाण्यासाठी लोक तुला मारून टाकतील. तेव्हा जो मोठेपणा तुझ्या नाशाला कारण होईल त्याची अपेक्षा तू कशाला करतोस ?'
तात्पर्य - लहानपण दे गा देवा । न चले कोणाचाही हेवा ॥