या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३६) पारधी आणि कवडा

एकदा एक कवडा एका पारध्याच्या जाळ्यात सापडला. तेव्हा तो दीनवाणेपणानं म्हणाला, 'दादा, मला जर तू सोडून देशील तर मी दुसच्या कवडयांना फसवून तुझ्या जाळ्यात आणीन. ते ऐकून पारधी म्हणाला, 'अरे एवढी खटपट करून तुला पकडलंय् ते काय सोडण्यासाठी होय ? अन् स्वत:च्या बचावासाठीच जी आपल्या भाऊबंदांना संकटात टाकती अशा नीच माणसांवर तर दया दाखवणं अजिबात योग्य नाही. तेव्हा मी तुला सोडणार नाही ! असा घातकीपणा करणाच्याला शासन झालंच पाहिजे.
तात्पर्य -स्वार्थासाठी आपल्याच लोकांचा नाश करण्यास निघणाच्या माणसाइतका दुष्ट कोणी नाही.