या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

उंटाचे प्रथमदर्शन

एका प्रदेशातील लोकांनी उंट पहिल्यांदाच पाहिला. तेव्हा त्याचे ते विचित्र रूप पाहून ते भिऊन पळून गेले. पण पुढे त्यांना कळले की त्याच्यापासून काही अपाय नाही. हा तर अगदीच गरीब प्राणी आहे. तेव्हा ते त्याला कामासाठी खूप राबवू लागले. त्याच्या पाठीवर मोठमोठी ओझी लादून त्याला उन्हातान्हात दूरदूर हिंडवू लागले.
तात्पर्य - प्रथमदर्शनी एखाद्या गोष्टीचे माणसाला भय वा कौतुक वाटते पण नंतर मात्र ती गोष्ट त्याला क्षुल्लक वाटू लागते.