या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

३३) माळी आणि त्याचा कुत्रा

एका माळ्याचा कुत्रा विहीरीच्या काठी उडया मारीत असता तोल जाऊन विहीरीत पडला. त्याचे ओरडणे ऐकून माळी त्याला वर काढायला गेला. परंतु तसे करीत असताना तो कुत्रा त्याला चावला. तेव्हा चिडून त्या माळ्याने त्याला विहीरीत तसेच सोडून दिले. त्यामुळे तो कुत्रा बुडून मरण पावला. 
तात्पर्य- कृतघ्न माणूस मरू लागला तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही.