या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१९) आम्ही असे शिकलो

"आयते शर्ट ते बी
ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ,
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस.
.
खताची पिशवी
. स्कूल बॅग,
. ओढ्याचं पाणी
. वाॅटर बॅग
धोतराचं फडकं
. आमचं टिफीन,
. खिशात ठेवुन
. करतो इन.
.
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार..
.
रानातला रानमेवा
. भारी मौज,
. अनवाणी पाय
. आमचे शुज,
. काट्यांच रूतणं
. दगडांची ठेच,
. कसा सोडवायचा
. हा सारा पेच,
.
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट,
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत,
.
. पेन मागता
. कांडी मिळायची,
. गाईड मागण्याची
. भिती वाटायची,
. केस कापण्याची
. एकच शक्कल,
. गप्प बसायचे
. होईपर्यंत टक्कल. ...
.
गेले ते दिवस,राहिल्या फक्त आठवणी.....

No comments:

Post a Comment