या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२०) गाढव, माकड आणि चिचुंद्री

एके दिवशी एक गाढव आणि एक माकड बोलत आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत. माकड म्हणाले, 'माझ्या या लांबच लांब शेपटाची तर मला फारच लाज वाटते. त्याऐवजी मला कोल्ह्यासारखी गोंडेदार शेपूट असतं तर किती मजा आली असती. हे सर्व ऐकून एक चिचुंद्री हळूच पुढे आली आणि म्हणाली, तुम्ही उगाच का रडत बसता? मला तर शिंग नाहीतच, शेपूटही इतकं आखूड आणि डोळ्यांनी सुद्धा नीट दिसत नाही. मग माझ्यापेक्षा तुमची स्थिती जास्त चांगली नाही कां ?
तात्पर्य - देवाने आपणास काय दिले आहे, त्यात समाधानी रहावे.