या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४३) शेतकरी आणि उंदीर

एक शेतकरी फार विनोदी होता. एकदा दुर्दैवाने त्याच्या घराला आग लागली असता घरातला एक उंदीर आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत बाहेर आला. तो आता पळून जाणार तोच त्या शेतकल्याने पकडून त्याला पुन्हा आगीत टाकले व म्हणाला, 'अरे त्या तुझ्या मित्रावर हा वाईट प्रसंग आला असता यावेळी तू त्याला सोडून जातोस, या तुझ्या कृतघ्नपणाला काय म्हणावे.
तात्पर्य- स्वतःचा जीव वाचविण्यासाठी माणूस सगळ्या पुण्याईवर व सद्गुणांवर पाणी सोडायला तयार होईल.