या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

सिंह आाणि बैल

एकदा एका सिंहाला, एखादा लठ्ठ बैल खाण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने एका बैलाला सन्मानाने आपल्या घरी मेजवानीस येण्याची विनंती केली. बैलाने ती मान्य केली व तो सिंहाच्या घरी गेला. तेव्हा त्याला, मोठीमीठी भांडी व स्वैपाकाची इतर तयारी दिसली. ते पाहून तो बैल पळत सुटला, तेव्हा सिंह म्हणाला,मित्रा असा पळून का चाललास?
तात्पर्य - कोणाच्या गोड बोलण्याला भुलून आपण त्याच्या जाळ्यात सापडली तरी त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच आपण सावध होऊन निसटावे, यातच शहाणपणआहे.